दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. बेदी विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बेदी पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील का, याचा निर्णय संसदीय पक्ष घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देण्यात आली. मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्त्वामुळेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बेदी यांनी पत्रकारांना सांगितले. त्या म्हणाल्या, मोदींमुळे देशात आशावाद निर्माण झाला आहे. त्यांच्यामुळे अनेक लोक स्वतःहून बदललले आहेत. माझ्याकडे ४० वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. पोलीस सेवेमध्ये मी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्याचा फायदा दिल्लीकरांना मिळवून देण्यासाठीच आपण निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले.
बेदी यांच्या प्रवेशामुळे भाजपला ताकद मिळणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
किरण बेदी यांचा भाजपत प्रवेश
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-01-2015 at 04:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran bedi enters in bjp