बेदी यांचा भाजप प्रवेश धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी व्यक्त केली आहे.  बेदी यांनी नेहमीच राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत लोकांचे प्रश्न मांडले. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये सहभागी होणे वेदनादायी असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.
तर किरण बेदी यांनी राजकारणात प्रवेश करावा यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला. ऑक्टोबर २०१२ मध्ये केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतर बेदी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. किरण बेदी यांच्या कार्यपद्धतीचा मी नेहमीच प्रशंसक होतो. त्यांनी राजकारणात यावे यासाठी प्रयत्नही केले.
बेदी यांनी आता राजकारणात प्रवेश केल्याने मी आनंदी असल्याची प्रतिक्रिया केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Story img Loader