भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा झटका बसला आहे. या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे एस. एस. बग्गा विजयी झाले आहेत.
कृष्णानगर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. १९९३ पासून या मतदारसंघातून भाजपचेच उमेदवार विजयी होत आले आहेत. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱया या मतदारसंघातून भाजपच्या किरण बेदी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. किरण बेदी यांनी आपला पराभव स्वीकारला असून, अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले आहे. केजरीवाल गेल्या पाच वर्षांपासून काम करीत होते. त्याला मिळालेले हे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader