भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या सहकारी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी यावेळी मी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच मतदान करणार असल्याचे म्हणत मोदींविषयी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मोदींबद्दल स्तुतिसुमने उधळली. किरण बेदी म्हणतात, “माझ्यासाठी देश सर्वात महत्वाचा आहे. एक स्वतंत्र मतदार म्हणून मी यावेळी नरेंद्र मोदींना मत देईन. ते एक स्थिर, उत्तम प्रशासन आणि सर्वसमावेशक सरकार देऊ शकतात.”
तसेच आपला भाजप पक्षाला पाठिंबा नसल्याचेही त्यावेळी म्हणाल्या. मात्र, सरकार चालविण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास अनुभवी मोदी हेच सर्वसमावेशक सरकार देऊ शकतात असे मत किरण बेदींनी व्यक्त केले आहे.
भ्रष्टाचारविरोधी लढ्यात अण्णांच्या सोबत किरण बेदी, अरविंद केजरीवाल यांची साथ होती. त्यानंतर राजकीय पक्ष काढण्याच्या मुद्द्यावरून केजरीवाल आणि किरण बेदींमध्ये मतभेत निर्माण झाले होते. केजरीवालांनी राजकारण प्रवेश करून सत्तेत येऊन आपल्या झाडूने भ्रष्टाचाराचा कचरा साफ करण्यास सुरुवात केली. तर, बेदींनी यावेळी प्रथमच एका राजकीय पक्षाच्या बाजूने भूमिका मांडली आणि मोदींना अप्रत्यक्षरितीने पाठिंबा दर्शविला. 

Story img Loader