आकाशवाणीवरून देशवासीयांशी ‘मन की बात’द्वारे थेट संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी करणार आहेत. भाजप दिल्लीत सत्तेवर आल्यास आकाशवाणीवरून ‘दिल की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट संपर्क साधण्याचे बेदी यांनी जाहीर केले आहे.जनतेशी संपर्कात राहणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करून बेदी यांनी म्हटले आहे की, सरकारने हाती घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती दरमहा ‘दिल की बात’मधून देण्याचा आपला मानस आहे. या कार्यक्रमाद्वारे केवळ मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि आमदारही दिल्लीकरांच्या संपर्कात राहणार आहेत.

Story img Loader