Kiran Mane Post About Kolkata Murder : कोलकाता येथील आर. जी. कर मेडीकल महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला आहे. या घटनेचे अनेक पैलू रोज समोर येत आहेत. अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य किरण माने ( Kiran Mane ) यांनी यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे आणि ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

नेमकी ही घटना काय घडली?

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. अभिनेते किरण माने ( Kiran Mane ) यांनी यासंदर्भात ममता बॅनर्जींवर टीका करणारी एक पोस्ट लिहिली आहे.

Sai Tamhankar News
Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणि अनिश जोग यांचं ब्रेक अप? ‘या’ स्टेटसमुळे रंगली चर्चा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
tmc mp arup chakraborty on kolkata doctor rape and murder case
Kolkata Doctor Rape and Murder: “आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत…”, TMC खासदाराचं डॉक्टरांबाबत धक्कादायक विधान!
kolkata rape case
Kolkata Rape Case : पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी विद्यार्थिनीला अटक; ममता बॅनर्जींविरोधातही आक्षेपार्ह टीप्पणी!
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
News About Sanjoy Roy What His Mother in Law Said?
Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया

किरण माने यांची पोस्ट काय?

कोलकता रेप मर्डर केसमधल्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ ‘ढोंग’ आहे. अरे ! तुम्ही मुख्यमंत्री आहात मॅडम. पोलीस आणि प्रशासन तुमच्या एका आदेशावर कामाला लागायला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांनीच आंदोलन आणि धरणे वगैरे करणं यापेक्षा भयाण हास्यास्पद प्रकार दुसरा असू शकत नाही. एक महिला असून या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या ममताजींचा त्रिवार निषेध ! असं किरण मानेंनी ( Kiran Mane ) म्हटलं आहे.

आपला देश इतिहासातल्या घृणास्पद कालखंडातून जातो आहे

आपला देशच आज इतिहासातल्या सगळ्यात घृणास्पद कालखंडातून चालला आहे. लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘आम्ही भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही’ असं म्हणत जणू स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा ममता बॅनर्जींसारखेच अशा ढोंगीपणाचे साक्षात बादशहाच ! एकीकडे मणिपूरसारख्या भयानक घटना घडूनही तिकडे न फिरकणार्‍या… कर्नाटकात तीन हजार महिलांवर बलात्कार करणार्‍याला उमेदवारी देणार्‍या… कुस्तीगीर महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍याला वाचवणार्‍या भ्रष्ट आणि नीच नराधमांनी देशाचं नरडं आवळलंय… तर दुसरीकडे बंगालसारख्या ज्या राज्यातल्या जनतेनं हुशारीनं ही अन्यायी क्रूर पिलावळ दूर ठेवली आणि ममताजींना सत्तेत बसवलं, त्यासुद्धा अशा नौटंकीबाज निघाव्यात हे केवढं मोठं दुर्दैव ! असंही किरण माने ( Kiran Mane ) म्हणाले आहेत.

हे पण वाचा- Kolkata Doctor Rape and Murder : “कोलकाता पीडितेला न्याय द्या!” पद्म पुरस्कार विजेत्या ७० डॉक्टरांचं पंतप्रधान मोदींना पत्र

जनतेने न्यायासाठी कुणाकडे बघायचं?

भक्तडुक्करपिलावळीला आणि चाटू मिडीयाला तर जिथं भाजपाचे सरकार नाही, तिथलेच फक्त ‘सिलेक्टिव्ह’ अत्याचार दिसतात…किंवा अत्याचार करणारा मुस्लीम असला तर मात्र यांचं तोंड आणि बूड सगळंच पेटून उठतं… इतरवेळी यांच्या बहिणींची रस्त्यात धिंड निघाली तरी हे सत्ताधार्‍यांची बाजू घेऊन तिला देशद्रोही ठरवत खदाखदा हसतील. अशा नालायक लोकांच्या भवतालात गुरफटलेल्या जनतेनं न्यायासाठी कुणाकडं बघायचं? कुणाचा आधार मागायचा??

हे असंच चालू राहिलं तर आपल्याकडं श्रीलंका आणि बांगलादेशपेक्षा भयानक उद्रेक होऊ शकतो. सत्ताधार्‍यांनो, जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ये कुर्सी है, तुम्हारा जनाज़ा तो नहीं है… कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते !

किरण माने

अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होते आहे.