दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर किरीट सोमय्यांची अडवणूक
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते किरीट सोमय्या यांना आत जाण्यापासून सदनाच्या सुरक्षारक्षकांनी रोखले. त्यामुळे ते संतापले व किरीट सोमय्या आणि सुरक्षारक्षकांमध्ये काही काळ वाद झाला. “महाराष्ट्राच्या माणसांना महाराष्ट्र सदनात जाण्यासाठी रोखले जाते. इथवर यांची मजल जाते म्हणजे सरकार स्वत:ला नक्की काय समजते?” अशा शब्दांत त्यानी आपला संताप व्यक्त केला. सुरक्षारक्षांसोबत झालेल्या वादावादीनंतर थोड्यावेळाने सोमय्यांना सदनात सोडण्यात आले.
किरीट सोमय्या यांनी काल शनिवारी महाराष्ट्र सदनाची बांधकामे अजूनही अपूर्ण असल्याचा आरोप केला होता. त्याचाच पुरावा देण्यासाठी सोमय्या आज रविवार महाराष्ट्र सदनात पोहोचले. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करताना कंत्राटदार चमणकर यांना सरकारने पन्नास हजार स्वेअरफुटाचा एफएसआय फुकटात दिल्याचे टीकास्त्र किरीट सोमय्यांनी केले आहे.

Story img Loader