कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी मतदारांना आकृष्ट करण्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा घाट घातलेला असतानाच माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मात्र शेट्टार सरकार पाडण्याचा निर्धार केला आहे.येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीच्या कार्यकारी समितीची शुक्रवारी बैठक होत असून त्या बैठकीत यासंबंधीच्या डावपेचांवर कृतियोजना आखण्यात येणार आहेत. आम्ही या सरकारला अर्थसंकल्प मांडू देणार नाही. पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शेट्टार सरकार खाली खेचण्याची व्यूहरचना निश्चित करण्यात येईल, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट संकेत दिले.
आगामी मे महिन्यात राज्य विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्याआधी ८ फेब्रुवारी रोजी राज्याचा २०१३-१४ चा अर्थसंकल्प सादर करण्याचा शेट्टार सरकारचा इरादा आहे. ‘हे सरकार मृत झाले असून कोणत्याही परिस्थितीत ते यापुढे कार्यरत राहू नये,’ असे आपल्याला अनेक लोकांनी सांगितले असल्याचा दावा येडियुरप्पा यांनी  केला. आपले वारसदार डी. व्ही. सदानंद गौडा आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी आरूढ झालेले शेट्टार यांच्या कारकीर्दीत  कर्नाटक राज्य विकासाच्या क्षेत्रात गेल्या दीड वर्षांत ११ व्या स्थानी गेले, असा आरोप करतानाच आपल्या राजवटीत कर्नाटक राज्य दुसऱ्या स्थानी होते, असाही दावा येडियुरप्पा यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा