तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावतसुद्धा प्रवास करत होते. या दुर्घटनेत बिपिन रावत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) या पदाची घोषणा केल्यानंतर जनरल बिपीन रावत यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सीडीएस हे पद नेमकं काय आहे? आणि या पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या व्यक्तीकडे नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात, हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या.
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.