भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्ती विषयी आणि वाढत्या उद्योगांविषयी सध्या जोरदार चर्चा होते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की ५८ वर्षीय अदानी हे एकदा नव्हे तर दोनदा मृत्यूच्या दारात जाऊन परत आलेत. अदानी पहिल्यांदा अपहरण झाल्यानंतर सुखरूप बचावले होते. याशिवाय २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ल्यात देखील ते थोडक्यात बचावले होते. चला तर समजून घेऊन या दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय घडलं होतं.

गौतम अदानी यांचं किशोरवयात अपहरण

गौतम अदानी १९७८ मध्ये हिऱ्यांच्या कंपनीत कामासाठी मुंबईत आले. येथे त्यांनी महेंद्र ब्रदर या कंपनीत जवळपास २-३ वर्षे काम केलं. यानंतर त्यांनी मुंबईतील झवेरी बाजार येथे स्वतःची हिऱ्यांची कंपनी सुरू केली. त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून देत हिऱ्यांच्या व्यापारात उडी घेतली होती.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”

या व्यावसायात हात बसल्यानंतर गौतम अदानी १९८१ मध्ये चुलत भावाच्या पॉली विनाईल क्लोराईडच्या व्यवसायात मदत करण्यासाठी अहमदाबादला आले. यानंतर १९८८ मध्ये त्यांनी अदानी एक्सपोर्ट नावाने निर्यातीचा व्यापार सुरू केला. मात्र, १९९७ मध्ये अदानींचं अपहरण झालं. आरोपींनी सुटकेसाठी १०-११ कोटी रुपयांची मागणी केली.

१ जानेवारी १९९८ रोजी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, “गौतम अदानी आणि शांतीलाल पटेल यांच्या गाडीसमोर एक स्कुटर आडवी आली. त्यानंतर गाडी थांबल्यावर कर्णावती क्लब येथे एका व्हॅनमधून काही लोक आले आणि त्यांनी या दोघांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन अपहरण केलं. त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलं.”

अंडरवर्ल्ड डॉन फजल-उर-रहमान उर्फ फजलू रहमान याच्यावर या अपहरणाचा आरोप झाला. मात्र, अदानी यातून सुखरुप सुटले. अदानी या विषयावर खूप कमी बोलतात. एकदा लंडनच्या फायनान्शियल टाईम्सने घेतलेल्या मुलाखतीत याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले माझ्या आयुष्यात २-३ दुर्दैवी प्रसंग घडलेत. अपहरणाचा प्रकार त्यापैकीच एक आहे.

“२००८ च्या मुंबई हल्ल्यात मृत्यूला १५ फूट अंतरावरून पाहिलं”

२००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी प्रसिद्ध ताज हॉटेलला लक्ष्य केलं. त्यावेळी गौतम अदानी याच हॉटेलमध्ये एका उद्योगपतीसोबत जेवण करत होते. गोळीबार आणि हँड ग्रेनेडचा वापर झाल्यानंतर ताज हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी अदानी यांच्यासह तिथं उपस्थित सर्वांना बेसमेंटमध्ये नेलं. तेथे अदानी २६ नोव्हेंबरचा पूर्ण दिवस होते.

हेही वाचा : मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’; २० महिन्यात १८०८ टक्क्यांनी वाढली संपत्ती

या ठिकाणी सर्वच उद्योगपती घाबरले होते. प्रत्येकजण जीव वाचावा अशी प्रार्थना करत होता. अदानी यांनी याचवेळी घरच्यांशी फोनवर बोलून त्यांना आधार दिला. अखेर दुसऱ्या दिवशी त्यांना हॉटेलच्या मागच्या बाजूने बाहेर काढण्यात आले. यानंतर ते अहमदाबादमध्ये पोहचल्यावर त्यांनी आपण मृत्यूला १५ फूट अंतरावरून पाहिल्याचं म्हटलं.

Story img Loader