जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेस्ट (Bill Gates) यांची मुलगी जेनेफर गेट्सनं (Jennifer Katharine Gates) १६ ऑक्टोबर २०२१ रोजी मोजक्या ३०० पाहुण्यांच्या उपस्थितीत न्यू यॉर्कमध्ये लग्न केलं. तिनं इजिप्शियन मूळ असलेल्या नाएल नासरला (Nayel Nassar) आपला जोडीदार म्हणून निवडलं. यानंतर जगभरात नाएल नासर कोण याविषयी उत्सुकता निर्माण झालीय. त्याचा हा खास आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इजिप्शियन कुटुंबातील व्यावसायिक दर्जाचा उत्तम घोडेस्वार

नाएल नासर मुळचा इजिप्तचा आहे. मात्र, त्याचा जन्म शिकागोमध्ये झाला. त्याला एक भाऊ असून त्याचं नाव शराफ नासर (Sharaf Nassar) असं आहे. नाएलचं बालपण त्याच्या आई-वडिलांसोबत कुवैतमध्ये गेलं. त्याच्या पालकांनी कुवैतमध्ये आर्कीटेक्चर फर्म विकत घेतली आणि तिथंच स्थिरावले. नाएल उच्च शिक्षणासाठी २००९ मध्ये अमेरिकेमध्ये गेला. नाएलने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं आहे. त्यानं २०१३ साली मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं.

वयाच्या पाचव्या वर्षापासून घोडेस्वारी

नाएलला लहानपणापासूनच घोडेस्वारीची आवड आहे. तो वयाच्या पाचव्या वर्षापासून घोडेस्वारी करतो. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यानं स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. नाएलने आपल्या देशासाठी घोडेस्वारीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

खेळातील आवडीनेच जेनिफर आणि नाएलची ‘लव्ह स्टोरी’

विशेष म्हणजे नाएल आणि जेनिफर गेट्स यांची लव्ह स्टोरी या खेळांच्या आवडीतूनच झाल्याचं त्यांनी सांगितलंय. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घोड्यांच्या शर्यतीवेळी २०१६ मध्ये पहिल्यांदा जेनिफर आणि नाएल यांची ओळख झाली होती. जेनिफर आणि नाएल या दोघांनाही घोडेस्वारीची प्रचंड आवड आहे. घोडेस्वारीची आवड असल्यानेच जेनिफर आणि नाएल दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले.

हेही वाचा : Bill ‘Gets’ Son In Law: गेट्स यांच्या मुलीने ‘या’ मुलाला दिला लग्नसाठी होकार

नाएल २०२० ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये इजिप्तच्या संघाकडून घोडेस्वारी प्रकारात सहभागी झाला होता. जेनिफरप्रमाणेच नाएलसुद्धा गर्भश्रीमंत आहे. त्याच्या पालकांची गल्फमध्ये मोठी आर्कीटेक्चर फर्म आहे. याशिवाय नाएल देखील व्यावसायिक दर्जाचा खेळाडू असण्यासोबत एक व्यावसायिक देखील आहे. त्याने कॅलिफोर्नियात २०१४ मध्ये नासर स्टेबल्स (Nassar Stables LLC) नावाची कंपनी स्थापन केलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know all about who is nayel nassar son in law of bill gates and husband of jennifer katharine pbs