What it takes to be Sunita Williams : गेल्या ९ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून अंतराळात असलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या १९ मार्च २०२५ रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. त्यामुळे सध्या सुनिता विल्यम्स यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पण विल्यम्स यांच्यासाठी हा अंतराळातून जमीनीवर परतण्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. करण अंतराळातील मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये घालवलेल्या काही महिन्यांमध्ये त्याचे मानवी शरीरावर अनेक परिणाम होतात. जसे की हाडांची घनता कमी होते, स्नायूंमधून ताकद नाहीशी होते, नजर कमजोर होते आणि हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये ताण येतो.

इतकेच नाही तर रेडिएशनच्या संपर्कात आल्यामुळे कर्करोगाचा धोका देखील वाढतो. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना शरीराचे संतुलन आणि समन्वय साधताना अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक अडचणींबरोबरच अंतराळवीरांना त्यांनी केलेल्या दीर्घ अंतराळातील प्रवासामुळे (space travel) मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याची देखील चाचणी घेतली जाते.

या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रश्न पडला असेल की इतके सगळ्या अडचणी येणार असतील तर लोक अंतराळवीर का बनतात? त्यांना यामधून नेमकं काय मिळतं? तर याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

अंतराळवीरांसाठी नासा (NASA) काय करते?

अंतराळवीरांना या अत्यंत कठीण परिस्थितींसाठी तयार करण्यासाठी नासाकडून जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा, विमा आणि पुनर्वसनाची सुविधा पुरवली जाते. अंतराळवीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विस्तृत हेल्थ कव्हरेज ज्यामध्ये विशेष चाचण्या, फिटनेस प्रोग्रम्स आणि मोहिमेच्या आधी, दरम्यान आणि नंतर देखील नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता मानसिक आधार पुरवला जातो.

मोबदल्याचा विचार केला तर अत्यंत सन्मानाचे तरीही अत्यंत कठीण असे हे करिअर आहे. सुनिता विल्यम्स यांना १०००,००० डॉलर ते १५२,२५८ डॉलर्सच्या दरम्यान पैसे कमवतात. त्यांच्या मोहिमेचे स्वरूप आणि अनुभव यावरून ही रक्कम कमी अधिक होई शकते. नासा अंतराळवीरांचे नोंदणी ही नासा अंतराळवीरांना फेडरल एम्प्लॉईज रिटायरमेंट सिस्टम (FERS) अंतर्गत होते, ज्यामध्ये ४०१ (के) पद्धतीने सेव्हिंग्स प्लॅन आणि पेन्शचे लाभ त्यांना मिळतात. मोहिम आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण यासाठी प्रवास आणि राहण्याच्या सोयीसाठी त्यांना भत्ता दिला जातो.

पैशांबरोबरच अंतराळवीरांना इतरही अनेक लाभ मिळतात, जसे की त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळते. अनेक अंतराळवीर अशा मोहिमांनंतर ‘पब्लिक स्पीकिंग’, पुस्तके लिहणे अशी कामे देखील करतात.

अंतराळवीर बनण्यासाठी काय करावे लागते?

सुनिता विल्यम्स यांच्याप्रमाणे अंतराळवीर बनने हे काही सोपे काम नाही. यासाठी पहिल्यांदा तुम्हाला इंजिनियरिंग, बायोलॉजिकल सायन्स, फिजीक्स सायन्स, कंप्युटर सायन्स, किंवा गणित या विषयातील STEM डिग्री मिळवावी लागेल. मास्टर्स डिग्री असेल तर अजूनच उत्तम समजले जाते. जेट एअरक्राफ्ट पायलट म्हणून ज्यांना संधी हवी आहे त्यांना नासामध्ये येण्यासाठी किमान तीन वर्षांचा व्यावसायिक अनुभव किंवा १००० तास पायलट-इन-कमांड टाइम असणे आवश्यक आहे.

इतकेच नाही तर तुम्ही शारीरिकरित्या तंदुरुस्त असणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक आरोग्याबाबत येथे तडजोड होऊ शकत नाही. अंतराळवीरांना नासाच्या दीर्घ काळ चालणार्‍या स्पेसफ्लाइट चाचण्या उत्तीर्ण कराव्या लागतात. तसेच त्यांना भाषेवर प्रभुत्व हवे, विशेषतः रशियन भाषा उत्तम आली पाहिजे, कारण ISS मोहिम ही रॉसकोसमॉसच्या सहकार्याने चालवली जाते.

Story img Loader