टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये ‘मी ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊ का?’ असा प्रश्न विचारत पोल घेतला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देतील त्याप्रमाणे मी निर्णय घेईन, असं म्हटलं. आता या ट्विटर पोलचा निकाल आला आहे. या पोलमध्ये १ कोटी ७५ लाख युजर्सने मतदान केलं आहे. यात बहुमत एलॉन मस्क यांनी राजीनामा द्यावा, यावर आलं आहे. हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

एलॉन मस्क यांच्या ट्वीट पोलमध्ये ५७.५ टक्के लोकांनी मस्क यांनी ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा, यावर मतदान केलं. दुसरीकडे ४२.५ युजर्सने मस्क यांनी राजीनामा देऊ नये, याला मतदान केलं. यासह बहुमत एलॉन मस्क यांनी राजीनामा द्यावा यावर आलं आहे. त्यामुळे मस्क काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
AAP
7 MLAs quit AAP ahead of Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर AAP ला खिंडार! सात आमदारांनी सोडला पक्ष
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”

एलॉन मस्क यांनी काय ट्वीट केलं होतं?

एलॉन मस्क म्हणाले होते, “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावं का? मी या ट्विटर पोलच्या निकालाला बांधील असेन.”

या ट्वीटवर मस्क यांचे चाहते त्यांनी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होऊ नये असं सांगत आहेत. दुसरीकडे मस्क यांच्या निर्णयांवर नाखूश वापरकर्ते या ट्विटर पोलला काहीही अर्थ नाही. कागदोपत्री कामांसाठी वेगळी व्यक्ती नेमली जाईल आणि मुख्य निर्णय मस्क यांच्या म्हणण्याप्रमाणेच होतील, अशी टीका करत आहेत.

आणखी वाचा : विश्लेषण: सोशल मीडियावर तुमची मतं दडपण्यासाठी खास ‘टूल्स’चा वापर? ‘ट्विटर शॅडो बॅन’ नेमकं आहे तरी काय?

एलॉन मस्क १५० कोटी ट्विटर अकाउंट डिलीट करणार

दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटरची कमान हातात घेतल्यापासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. एकीकडे कंपनीत कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीचा प्रश्न ऐरणीवर आहे, तर दुसरीकडे मस्क एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी एक मोठा निर्णय घेत मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवरील १५० कोटी अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती देताना त्यांनी म्हटलं होतं, “१५० कोटी ट्विटर अकाउंटला लवकरच बंद करण्यात येईल, जे अकाउंट अनेक वर्षांपासून सक्रीय नाहीत. अशा अकाउंटला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकून नवीन युजरसाठी जागा बनवण्यात येईल.” या १५० कोटी अकाउंटला काढून टाकण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे ट्विटर युजरची चिंता वाढली आहे. या लिस्टमध्ये आपला अकाउंट आहे का? असा प्रश्न युजर्सला पडला आहे.

हेही वाचा : विश्लेषण: ट्विटरमध्ये राजीनामासत्र का सुरू आहे? एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलमध्ये नेमकं काय म्हटलं?

एलॉन मस्क यांनी ट्विटरवर स्पष्ट सांगितलं की, ज्या १५० कोटी अकाउंटला बंद करण्यात येणार आहे, त्यामध्ये दिर्घकाळापासून सक्रीय नसलेल्या अकाउंटचा समावेश करण्यात येईल. म्हणजेच, मागील काही वर्षांपासून ज्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आली नाही, तसंच कोणत्याही प्रकारचं सक्रीय सहभाग दिसला नाही, अशांना इनअॅक्टिव्ह करुन बंद करण्यात येईल.

Story img Loader