Mulayam Singh Yadav Family in Politics : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं सोमवारी (१० ऑक्टोबर) निधन झालं. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. त्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलायम सिंह यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी आदरांजली दिली. विशेष म्हणजे राजकारणात येणारे मुलायम सिंह त्यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य होते. मात्र, त्यांच्यानंतर यादव कुटुंबातील अनेक लोक राजकारणात आले आणि विविध पदं भुषवली. यादव कुटुंबातील कोणते सदस्य राजकारणात आले, त्यांनी कोणत्या निवडणुका लढल्या आणि कोणत्या जिंकल्या? ते सध्या कोणकोणत्या पक्षात सक्रीय आहेत? याचा हा खास आढावा…

सैफई गावातील मुलायम सिंह त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या आजोबांचं नाव मेवाराम असं होतं. मेवाराम यांना दोन मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव सुघर सिंह आणि लहान मुलाचं नाव बच्चीलाल सिंह असं होतं.

Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Nitin Gadkari, Mahadevrao Shivankar, Amgaon,
एकाच पक्षातील मतभेद असलेले दोन माजी मंत्री समोरासमोर… एक रुग्णशय्येवर, दुसरा….
Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
Akola Assembly Election 2024, Caste Equation in Akola Vidhan Sabha Constituencies,
Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड

यातील सुघर सिंह यांना पाच मुलं होती. या पाचपैकी तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा म्हणजे मुलायम सिंह. सुघर सिंह यांच्या पहिल्या मुलाचं नाव अभयराम सिंह, दुसऱ्याचं रतन सिंह, तिसऱ्याचं मुलायम सिंह, चौथ्याचं राजपाल सिंह आणि पाचव्याचं नाव शिवपाल सिंह यादव.

मेवाराम यांचा लहान मुलगा बच्चीलाल सिंह यांच्या मुलाचं नाव रामगोपाल यादव असं आहे. रामगोपाल यादव यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव अक्षय यादव असं आहे.

मुलायम सिंह यादव यांचं कुटुंब –

पहिली पत्नी – मालती देवी
मुलगा – अखिलेश यादव (पत्नी – डिंबल यादव)

दुसरी पत्नी साधना गुप्ता
मुलगा – प्रतिक यादव (पत्नी अपर्णा यादव)

मुलायम सिंह यादव यांचं दोनदा लग्न झालं होतं. पहिल्यांदा मालती देवी यांच्यासोबत लग्न झालं. अखिलेश यादव मालती देवी यांचे पुत्र आहेत. दुसऱ्या पत्नीचं नाव साधना गुप्ता. साधना गुप्ता यांच्या मुलाचं नाव प्रतिक यादव. ते राजकारणापासून दूर राहतात. मात्र, त्यांची पत्नी अपर्णा यादव राजकारणात सक्रीय आहेत. अपर्णा यादव आधी सपात होत्या, मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश केला.

मुलायम सिंह यांचे भाऊ आणि कुटुंब –

१. रतनसिंह यादव
मुलं – रणवीर सिंह, तेजप्रताप यादव

मुलायमसिंह यांचे सर्वात मोठे बंधू रतन सिंह यांच्या कुटुंबातून त्यांचा नातू तेज प्रताप सिंह मैनपुरीमधून खासदार होते. तेज प्रताप म्हणजे रतन सिंह यांचा मुलगा रणवीर सिंह यांचा मुलगा. रणवीर सिंह यांचं निधन झालं आहे. तेज प्रताप यांचं लग्न लालू प्रसाद यादव यांच्या मुलीशी झालेलं आहे.

२. राजपाल सिंह यादव
मुलगा – अंशुल यादव

अंशुल यादवही राजकारणात सक्रीय आहेत. ते दोनदा जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांची पत्नीही राजकारणात सक्रीय आहे.

३. अभयराम सिंह
मुलगा – धर्मेंद्र यादव (पत्नी – संध्या यादव)

अभयसिंह यादव यांचा मुलगा धर्मेंद्र सिंह यादव तिनदा खासदार होते. सुरुवातीला एकदा मैनपुरीतून आणि नंतर दोनदा बदायूंमधून निवडून आले. मात्र, २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. आझमगड लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यांना पराभव पत्करावा लागला.

४. शिवपाल सिंह यादव
मुलगा – आदित्य यादव

शिवपाल सिंह यादव स्वतः आणि त्यांचा मुलगा आदित्य यादव दोघेही राजकारणात सक्रीय आहेत. मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तेव्हा शिवपाल यादव यांनीच पक्षाची बाजू सांभाळली. मात्र, पुढे अखिलेश यादव यांच्या राजकीय प्रवेशानंतर शिवपाल सपातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना स्वतःच्या बळावर एकही निवडणूक जिंकता आली नाही. त्यामुळे त्यांनी २०२२ मध्ये सपासोबत युती केली आणि सपाकडून निवडणूक लढले. त्यात ते जिंकले.

हेही वाचा : मुलायम सिंह यादव यांनी ८२ वर्ष पाळलेली जीवनशैली कशी होती? पुरी- लोणचं, १४- १५ तास काम व रोज…

५. रामगोपाल यादव (चुलत भाऊ)

रामगोपाल यादव सध्या अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचा मुलगा अक्षय यादव फिरोजाबादमधून खासदार होता. अक्षय यादव २०१४ मध्ये मोदी लाटेतही निवडून आले, मात्र, सपातील फुटीनंतर शिवपाल यादव यांच्यामुळे २०१९ मध्ये अक्षय यादव यांचा पराभव झाला.