पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते असल्याचा दावा सातत्याने केला जातो. त्यांचे सोशल मीडियावरही सर्वाधिक फॉलोवर्स आहेत. पण, भारतासारख्या सर्वाधिक मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय का आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? या प्रश्नाचं उत्तर न्यू यॉर्क टाईम्सच्या एका वृत्तातून देण्यात आलं आहे.

“सोशल मीडियाचा चांगल्याप्रकारे वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत जुन्या रेडिओ या पद्धतीचाही वापर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधतात. त्यांचे संभाषण मनापासून असते. ते थेट लोकांच्या मनाशी भिडते. राष्ट्राच्या विकासासाठी केलेले त्यांचे भाषण जगाशी जोडते. दर महिन्याला प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रम मोदींना प्रत्येक सकारात्मक घडामोडी, लहान किंवा मोठ्या गोष्टींशी जोडतो”, असं न्यू यॉर्क टाईम्समध्ये मुजीब मशाल यांनी म्हटलं आहे.

Rietesh Deshmukh
Riteish Deshmukh : “झापूक झुपूक वारं आलंय, गुलिगत धोका आहे”, धाकट्या बंधूसाठी थोरला बंधू प्रचाराच्या मैदानात!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

हेही वाचा >> Video : ‘मोदी नाही मुद्दे की बात…”, विरोधी पक्षाच्या बैठकीवरून तेजस्वी यादवांचा मोदींना चिमटा; म्हणाले, “मीडियानिर्मित नेते…”

“नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांची लोकप्रियता नाही. तसेच ते सातत्याने विविध देशांना भेटी देतात म्हणूनही त्यांची लोकप्रियता वाढलेली नाही. परंतु, ते सहज लोकांवर आपली छाप पाडू शकतात. त्यांनी केलेल्या धोरणांचा लोकांवर प्रभाव आहे, म्हणून ते लोकप्रिय आहेत”, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, महिन्यातून एकदा त्यांच्या सरकारी बंगल्यात उभारलेल्या स्टुडिओमध्ये जातात. मायोक्रोफोनच्या मागे बसतात आणि त्यांचा रेडिओ शो सुरू करतात. या रेडिओ शोचे त्यांचे आतापर्यंत १०० हून अधिक भाग झाले आहेत”, असंही न्यू यॉर्क टाईम्समध्ये म्हटलं आहे.

“रेडिओ आजही भारतातील ग्रामीण भागातील महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओतून संवाद साधतात. जेणेकरून ते ग्रामीण भागातील जनतेशीही जोडले जातील. मोफत रेशनपासून ते सुधारित पायाभूत सुविधांबाबत ते यातून संवाद साधतात”, असं कौतुकही यातून करण्यात आले आहे.

हेही वाचा >> पंजाबचे तूप, उत्तराखंडचे तांदूळ आणि महाराष्ट्राचा.., पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना दिल्या ‘या’ १० भेटवस्तू

तरुणांवरही प्रभाव

“एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी आणि तरुणांशीही नियमित संवाद सादथात. मी तुम्हाला चांगले गुण मिळवण्यासाठी युक्त्या सांगू शकत नाही. कार मी माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवले नाहीत. परंतु, मित्रांनो मी तुमच्या संकटात तुमच्यासोबत आहे, असा विश्वास मोदी देतात. त्यामळे तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवरही मोदींचा चांगला प्रभाव आहे”, असंही या वृत्तात म्हटलं आहे.