Kolkata Doctor Murder Autopsy Report : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने राज्यभरात संप पुकारला आहे. गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनांनी केली आहे. या बलात्कार व हत्या प्रकरणाचं गाभीर्य पाहता, तसेच देशभरातील संतापाची लाट पाहता सरकारने हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवलं आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी नवी माहिती व धक्कादायक खुलासे होत आहेत.

कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. दरम्यान, आता एका डॉक्टरने दावा केला आहे की या बलात्कार व हत्या प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपी सहभागी आहेत. अखिल भारतीय शासकीय डॉक्टर संघाचे सरचिटणीस डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी दावा केला आहे की त्यांनी या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल वाचला आहे. या शवविच्छेदन अहवालात तरुणीच्या गुप्तांगात १५१ मिलीग्रॅम वीर्य आढळल्याचं नमूद करण्यात आलं आहे, असं गोस्वामी म्हणाले. तसेच ही माहिती सांगत गोस्वामी यांनी तरुणीवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार (सामूहिक बलात्कार) झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत

हे सामूहिक बलात्काराचं प्रकरण : डॉ. सुवर्ण गोस्वामी

डॉ. गोस्वामी म्हणाले, “शवविच्छेदन अहवालातून असे संकेत मिळत आहेत की या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त लोक सहभागी असावेत. डॉक्टर तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. या जखमा खोलवर झाल्या आहेत. तिच्यावर हल्ला करण्यासाठी जितकी ताकद लावली आहे ते पाहता हे एका माणसाचं काम नक्कीच नाही. तरुणीच्या कुटुंबीयांनी अनेकांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. कोलकाता पोलीस सांगतायत की या प्रकरणात एकच आरोपी सहभागी होता. मात्र शवविच्छेदन अहवाल वाचून असं वाटतंय की पोलिसांचा तपास अपुरा आहे.”

हे ही वाचा >> डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरण: तपास सीबीआयकडे; कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश, ममता सरकारला धक्का

आंदोलक डॉक्टरांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त

दरम्यान, या बलात्कार व खून प्रकरणाचा तपासही संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. आंदोलक डॉक्टरांनी दावा केला आहे की या बलात्कार व हत्या प्रकरणानंतरही सेमिनार हॉल (जिथे ही घटना घडली) तो खुला ठेवण्यात आला होता. दोन दिवस हॉल खुला होता. याबाबत पोलिसांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की येथे दुरुस्तीचं काम केलं जाणार होतं. त्यामुळे हॉल खुला ठेवलेला. मात्र डॉक्टरांनी सांगितलं की दुरुस्तीचं काम सेमिनार हॉलमध्ये नव्हे तर सेमिनार हॉलच्या बाजूच्या खोलीत केलं जाणार होतं. तसेच इतक्या मोठ्या सेमिनार हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील नव्हता. हा प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.