Kolkata Doctor Murder Case Disorder on Internet : कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी देशभरातील डॉक्टरांच्या संघटना व सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पीडितेसाठी प्रामुख्याने तरुणी व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दरम्यान, एका बाजूला या घटनेमुळे देशभरातून संतापाची लाट उसळलेली असतानाच काही लोकांनी विकृतीचा कळस केला आहे. काही लोक समाजमाध्यमांवर, इंटरनेटवर बलात्काराचा व्हिडीओ शोधत आहेत. तर, काही लोक याचा गैरफायदा घेऊन पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहेत.

इंडिया टूडेच्या ओपन सोर्स इन्व्हेस्टिगेशन पथकाला आढळलं आहे की, इंटरनेटवर अनेक लिंक्स व मल्टीमीडिया फाईल्स पीडितेचा पॉर्न व्हिडीओ म्हणून शेअर करण्यात आल्या. टेलिग्रामवरही अशा मल्टीमीडिया फाईल्स पाहायला मिळत आहेत. अनेक टेक कंपन्या देखील यात सहभागी आहेत. ५० हून अधिक संकेतस्थळं व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स स्कॅन केल्यानंतर असं आढळून आलं आहे की, जास्तीत जास्त वेब ट्रॅफिक मिळवण्यासाठी पीडितेचा व्हिडीओ म्हणून (अशा नावाने) अनेक लिंक्स व मल्टीमीडिया फाईल्स शेअर केल्या जात आहेत. फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, टेलिग्रामसारखा एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म, पॉर्न वेबसाईट्स व इतर वेबसाईट्ससह डोमेन्सवर या गोष्टी सर्रास शेअर केल्या जात आहेत.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी

विकृतीचा कळस!

कोलकात्यामधील घटनेनंतर अनेक सोशल मीडिया साईट्स, पॉर्न साईट्स व इंटरनेटवर सेक्स, पॉर्न, रेप पॉर्न, कोलकाता रेप व्हिडीओ असे शब्द सर्च केले जात आहेत. कोलकाता रेप व्हिडीओ, डॉ. (पीडितेचं नाव) व्हिडीओ, डॉ. (पीडितेचं नाव) रेप व्हिडीओ, पीडितेचं नाव आणि व्हिडीओ असे कीवर्ड्स वापरले जात आहेत. पॉर्नसह अन्य काही कीवर्ड्सचा वापर करून कोलकात्यामधील पीडितेचा व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न होत आहे. काही कंपन्यांना यात वेब ट्रॅफिक मिळवण्याची संधी दिसत आहे. त्यामुळे त्यांनी देखील याच कीवर्ड्सचा वापर करून वेगवेगळ्या लिंक्स व मल्टीमीडिया फाईल्स शेअर केल्या आहेत.

हे ही वाचा >> Kolkata Rape Case : कोलकात्यातील आर. जी. कर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड; गैरव्यवहारप्रकरणी होणार चौकशी!

अनेकजण या प्रकरणाचा व्हिडीओ इंटरनेटवर शोधत आहेत. ही शोधमोहिम केवळ भारतातील युजर्सपुरती मर्यादित नाही. नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेतील युजर्स देखील या घटनेचा व्हिडीओ शोधत आहेत, हे सर्वाधिक धक्कादायक आहे.

Story img Loader