Kolkata Doctor Rape and Murder : कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या केल्याचा मुद्दा देशभरात चर्चेत आला आहे. आज देशभरातल्या रुग्णालयांनी संप पुकारला आहे. या प्रकरणातल्या आरोपीला कठोरातल्या कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येते आहे. अशात पीडितेच्या शवविच्छेदन (Kolkata Doctor Rape) अहवालातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग

पीडितेच्या ( Kolkata Doctor Rape ) कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दुसऱ्या बाजूला या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी नवीन व धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या घटनेचा तपास करत आहे) सांगितलं की, रुग्णालयातील काही इंटर्न व डॉक्टर या गुन्ह्यात ( Kolkata Doctor Rape ) सहभागी असू शकतात. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. यासह मृत तरुणीच्या आई-वडिलांचा ज्या-ज्या लोकांवर संशय़ आहे त्यांच्या नावांची यादी त्यांनी सीबीआयला दिली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंततर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Neil Gaiman sexual misconduct
Who is Neil Gaiman: ‘लहान मुलासमोरच माझ्यावर लैंगिक अत्याचार’, ८ महिलांचे प्रसिद्ध लेखकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
Three arrested in rape molestation cases
बलात्कार, विनयभंगातील तीन आरोपींना अटक
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!

सीबीआय अधिकाऱ्याने काय सांगितलं?

एका सीबीआय अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, पीडितेच्या आई-वडिलांनी आम्हाला सांगितली की त्यांच्या मुलीवरील बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) व हत्येमागे अनेक जण असू शकतात. त्यांनी त्यांच्या मुलीबरोबर रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर व इंटर्न्सवर (प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी) संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आम्हाला काही नावं दिली आहेत.

कोलकाता पीडितेच्या शवविच्छेदन अहवालाबाबत पांचजन्यचा दावा काय?

१) पीडितेसह अॅबनॉर्मल सेक्स, तसंच तिचा लैंगिक छळ ( Kolkata Doctor Rape ) करण्यात आला त्यामुळे गुप्तांगावर खोल जखमा झाल्या

२) पीडितेने ओरडू नये म्हणून तिचं नाक आणि गळा दाबण्यात आला, गळा आवळला गेल्याने थायरॉईड कार्टिलेजला इजा झाली

३) पीडितेचं डोकं भिंतीवर ठेवून तिचा गळा दाबण्यात आला, त्यामुळे तिला ओरडता आलंच नाही. तिच्या पोटावर, ओठांवर, बोटांवर आणि डाव्या पायावर अनेक जखमा

४) पीडितेवर इतका भयंकर हल्ला करण्यात आला की तिच्या चश्म्याच्या काचा तिच्या ( Kolkata Doctor Rape ) दोन्ही डोळ्यांमध्ये घुसल्या. त्यामुळे तिच्या डोळ्यांमधून आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहात होतं.

५) पीडितेच्या चेहऱ्यावर नखाने ओरखडल्याच्या खुणा आहेत, पीडितेने स्वतःला वाचवण्यासाठी खूप संघर्ष केल्याचंही अहवालात नमूद आहे. असा दावा पांचजन्यने केला आहे.

हे पण वाचा- Kolkata Doctor Rape Case : “पीडितेला न्याय देण्याऐवजी…”, कोलकाता बलात्कार प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप; म्हणाले, “कोणत्या विश्वासाने…”

सीबीआयने शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रुग्णालयातील काही डॉक्टरांची, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जे घटनेच्या दिवशी रुग्णालयात हजर होते. यासह सीबीआयने रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना चौकशीसाठी नेलं आहे. बलात्कार व खूनाच्या घटनेनंतर डॉ. घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.

Story img Loader