Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून तो तुरुंगात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. आता या प्रकरणात मृत पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कोलकाता घटनेतील पीडितेच्या आई-वडिलांनी म्हटलं की, कोलकाता पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पीडितेच्या आई-वडिलांनी काय म्हटलं?

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप करताना म्हटलं, “पोलिसांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेईपर्यंत पोलीस ठाण्यात आम्हाला थांबावं लागलं होतं. मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला, त्यावेळी आम्हाला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पैशांची ऑफर दिली होती, पण आम्ही लगेच नाकारली.”

Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Kissing is not sexual Assault Madras high Court
Madras High Court: “जोडप्याने एकमेकांचे चुंबन घेणे स्वाभाविक,” उच्च न्यायालयाने रद्द केला लैंगिक अत्याचाराचा खटला
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा : राज्यात महिला अत्याचारविरोधी कायदा पारित होत असतानाच कोलकात्यात महिलेचा विनयभंग; दोघांना अटक

दरम्यान, कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर अद्यापही अनेक ठिकाणी निदर्शने सुरूच आहेत. बुधवारीही हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आपल्या मुलीच्या न्यायासाठी लढणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे पालकही या आंदोलनात सहभागी झाले होते.

नेमकी घटना काय घडली होती?

कोलकाता येथील आर.जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला गेला. या घटनेवरुन देशभरातील डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

पीडितेच्या (Kolkata Doctor Rape) कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या. दुसऱ्या बाजूला या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी नवीन व धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या घटनेचा तपास करत आहे) सांगितलं की, रुग्णालयातील काही डॉक्टर या गुन्ह्यात (Kolkata Doctor Rape) सहभागी असू शकतात. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंततर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.