Kolkata Doctor Rape and Murder : कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. अशात या महिला डॉक्टरच्या डायरीने काही प्रश्न निर्माण केले आहेत.

पीडितेच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?

कोलकाता येथील के आरजी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) करण्यात आला, त्यानंतर तेवढ्याच क्रूरतेने तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर आता पीडितेच्या वडिलांचं दुःख समोर आलं आहे. माझी मुलगी ओपीडीमध्ये काम करत होती. पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत कुणीही तिला बोलवलं नाही किंवा कुणीही ती कुठे आहे हे बघायलाही गेलं नाही याचं मला खरंच आश्चर्य वाटतं आहे असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. यानंतर आता पीडितेच्या डायरीचा पैलू समोर आला आहे.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

पीडितेच्या डायरीतून काय समोर आलं आहे?

पोलिसांनी आत्तापर्यंत पीडित डॉक्टरची ( Kolkata Doctor Rape ) डायरी आणि तिच्या आई वडिलांकडून जी माहिती मिळवली आहे त्यानुसार ही माहिती समोर आली आहे की गेल्या काही दिवसांपासून पीडिता तणावाखाली होती आणि एक प्रकराच्या दबावाखाली काम करत होती. तिने तिच्या डायरीत लिहिलं आहे की आम्हाला ३६ तास काम करावं लागतं, यामध्ये काही नवी गोष्ट नाही. औषधांच्या रॅकेटबाबत तिला काही माहिती मिळालेली असू शकते यातून तिची हत्या ( Kolkata Doctor Rape ) झाली का? असा प्रश्न तिच्या वडिलांनी विचारला आहे.

पीडितेच्या सहकाऱ्यांनी काय काय आरोप केले आहेत?

औषधांमध्ये होणारे फेरबदल आणि निष्काळजीपणा याच्याशी एक रॅकेट होतं त्याबाबत तिला माहिती होती असं या महिलेच्या सहकारी डॉक्टरांनी म्हटलं आहे. तिने ट्रेनी डॉक्टर म्हणून एक वर्ष काम केलं होतं तरीही तिला दुसऱ्या वर्षीही तसंच काम करायला लावलं. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या देखरेखीत तिने पहिलं वर्ष पूर्ण केलं होतं तरीही तिला ही ‘शिक्षा’ का देण्यात आली असाही प्रश्न काही डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. घोष यांचं ऐकलं नाही तर फॅकल्टी मेंबर्सची बदली केली जायची किंवा एमबीबीएसचे विद्यार्थी नापास व्हायचे असंही महिलेच्या सहकारी डॉक्टरांनी सांगितलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. रुग्णालयात्या बड्या माशांबाबत या महिला डॉक्टरला कळलं होतं त्यामुळेच तिची हत्या करण्यात आली असाही आरोप काही डॉक्टरांनी केला आहे.

हे पण वाचा- Kolkata Rape :”माझी मुलगी ओपीडी ड्युटीवर होती, सकाळी १० पर्यंत…” कोलकाता पीडितेच्या वडिलांचा उद्विग्न सवाल

पीडितेच्या आई वडिलांनी काय म्हटलं आहे?

पीडित मुलीचा मृत्यू ( Kolkata Doctor Rape ) झाल्याचं जेव्हा तिच्या आई वडिलांना सांगण्यात आलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्यावर कामाचा प्रचंड दबाव होता असं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरु आहे. पोलीस तपासावरुन हे समोर येतं आहे की पहाटे ३ ते ५ या कालावधीत तिच्यावर बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) करण्यात आला, तसंच तिची हत्या करण्यात आली. पोस्टमॉर्टेमच्या अहवालानुसार तिचा शारिरीक आणि लैंगिक छळही करण्यात आला. तिच्या चष्म्याच्या काचा फुटून तिच्या डोळ्यांमध्ये घुसल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे. अशात आता पोलीस आणि सीबीआयकडून डायरीतले तपशील शोधले जात आहेत.

Kolkata Rape News
कोलकाता येथील रुग्णालयात डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तिच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

पीडितेच्या सहकारी डॉक्टरांनी म्हटलंय हे प्रकरण साधं सरळ नाही

आम्हाला वाटत नाही की हे फक्त बलात्कार आणि हत्येचं प्रकरण आहे. तिला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं. ती सेमिनार हॉलमध्ये एकटी काय करत होती हा प्रश्न आहेच. तिच्या दुसऱ्याही एका सहकाऱ्याने हेच म्हटलं आहे की हे प्रकरण वरवर दिसतं तेवढं साधं आणि सरळ नाही. संजय रॉयला म्हणजेच जो आरोपी आहे त्याला हे कसं कळलं की सेमिनार हॉलमध्ये पीडिता ( Kolkata Doctor Rape ) एकटी आहे? रॉय हा फक्त बळीचा बकरा आहे, यामागे इतर बडे मासे आहेत असाही संशय या डॉक्टरने व्यक्त केला आहे. एवढंच नाही तर या प्रकरणात कोण आहे ते शोधलं पाहिजे आणि सगळ्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरते आहे.

Story img Loader