Kolkata Doctors Strike : कोलकाता या ठिकाणी ९ ऑगस्टला एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. यानंतर ज्युनियर डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांनी संप पुकारला होता. संप मागच्या ४१ दिवसांपासून सुरु होता आता तो मागे घेण्यात आला आहे. २१ सप्टेंबरपासून सगळे डॉक्टर कामावर परतणार आहेत. दोन दिवसांपूर्वी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली. त्यांनंतर काही वेळापूर्वीच डॉक्टरांनी संप ( Kolkata Doctors Strike ) मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. २० सप्टेंबरला संप जाहीरपणे मागे घेतला जाईल आणि २१ सप्टेंबरपासून डॉक्टर कामावर परततील.

कोलकाता येथील भीषण घटना देशभरात चर्चेत राहिली

कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयातल्या डॉक्टरवर संजय रॉयने बलात्कार केला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. ही घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली. एवढंच नाही तर आर.जी. कर रुग्णालयाचा काळा इतिहासही या घटनेने समोर आणला. पीडितेच्या आई वडिलांनीही ममता सरकारवर आरोप केले. त्यामुळे या रुग्णालयात घडलेली घटना, त्यानंतर बाहेर येणारे अनेक तपशील तसंच सहकारी डॉक्टरांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी यामुळे काय काय घडलं? त्याची चर्चा झाली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध नोंदवत आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी या ज्युनियर डॉक्टरांनी संप Kolkata Doctors Strike ) पुकारला होता. हा संप अखेर ४१ दिवसांनी मागे घेण्यात आला. पश्चिम बंगालचं ममता बॅनर्जी सरकार आणि आंदोलक डॉक्टर यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. सगळ्या डॉक्टरांनी २१ सप्टेंबरपासून कामावर परतण्याचं ( Kolkata Doctors Strike ) आश्वासन दिलं आहे. या दरम्यान आपात्कालीन सेवा सुरु राहतील तर ओपीडी सेवा बंद राहणार आहेत.

Kolkata hospital rape
Kolkata Rape Case : कोलकात्यातील रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग, वॉर्डबॉयने झोपलेल्या महिलेला पाहून…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
PMC filled more than 499 potholes in last 9 days
पुणे : पालिकेने नऊ दिवसांत बुजविले ४९९ खड्डे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची मलमपट्टी
Mumbai, boy died while playing,
मुंबई : शाळेत खेळताना आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
divorced woman commits suicide by jumping from building balcony in kalyan
कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या
Quit job and started spice business in own village
Success Story: नोकरी सोडून स्वतःच्या गावात सुरू केला मसाल्यांचा व्यवसाय; महिन्याला कमावतात लाखो रुपये
Student molestation Akola, Child Helpline Akola,
विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण : ‘चाईल्ड हेल्पलाईन’कडे तीन दिवसांपूर्वीच तक्रार, तरीही…
A drop in the number of patients due to the protest of doctors protesting the Kolkata incident Mumbai news
डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णसंख्येत घट; महानगरपालिका रुग्णालयांतील रुग्णांची संख्या हजाराच्या घरात

हे पण वाचा- Kolkata Case : “महिला डॉक्टरांनी नाईट ड्युटी करु नये हे कसं म्हणता? तुम्ही…”, सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारला सुनावलं

ममता सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य

ममता सरकारने या डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. कोलकाता येथील आरोग्य मंत्रालयाच्या मुख्यालयासमोर २० सप्टेंबरला संप ( Kolkata Doctors Strike ) जाहीरपणे मागे घेतला जाईल. त्यानंतर एक मोर्चा काढला जाईल आणि २१ सप्टेंबरपासून डॉक्टर कामावर रुजू होतील.

आंदोलक डॉक्टर अकीब काय म्हणाले?

आंदोलन काळात ज्युनिअर डॉक्टर्स फ्रंटने अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. कोलकाता पोलीस आयुक्त, डीएमई आणि डीएचएस यांना राजीनामा द्यायला आम्ही प्रवृत्त केलं. आम्ही संप मागे घेतला याचा अर्थ आमचं आंदोलन संपलेलं नाही. आम्ही नव्या पद्धतीने आंदोलन पुढे घेऊन जाऊ. २१ सप्टेंबरपासून आम्ही रुग्णालयात कामावर परतणार आहोत. काम सुरु केल्यानंतर प्रशासनावर आमचं लक्ष असणार आहे, आम्हाला काहीही चुकीचं वाटलं तर आम्ही पुन्हा एका ताकदीने मैदानात उतरणार आहोत असा इशाराही यावेळी डॉ. अकीब यांनी दिला.