Kolkata Rape and Murder : कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्टला एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. या महिला डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह रुग्णालयातल्या सेमिनार हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या डॉक्टरच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतर ही बाब समोर आली आहे की आधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. याबाबत आता मृत डॉक्टरच्या आईने एक दावा केला आहे.
नेमकी ही घटना काय घडली?
कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर ( Kolkata Rape and Murder ) अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. या घटनेतले नवे पैलू रोज समोर येत आहेत. आता आरोपी संजय रॉयबाबत तो या डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी आणि तिची हत्या करण्याआधी तो रेड लाइट एरियात गेला होता अशी माहिती समोर आली. आता यानंतर या पीडितेच्या आईने आणि वडिलांनी उद्विग्न करणारी प्रतिक्रिया दिली आहे.
हे पण वाचा- video : कोलकाता बलात्कार-हत्येची घटना डॉक्टरांमुळे झाली उघड? पीडितेचा मृतदेह नेणारी गाडी रोखली? वाचा सत्य
काय म्हटलं आहे पीडितेच्या आईने?
“माझ्या मुलीची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यासाठी कुणीतरी आरोपीला पाठवलं होतं. कारण रुग्णालयाची काही काळी रहस्यं तिला समजली होती. संजय रॉयला आमच्या मुलीला ठार करण्यासाठी कुणीतरी पाठवलं होतं. मी सोशल मीडियावर काही वाचलं तरीही मला वेदना होतात. इथे तर आमच्या मुलीबरोबरच ही घटना घडली आई म्हणून मला किती वाईट वाटत असेल तुम्ही समजू शकत नाही.” आज तक बांगलाला दिलेल्या मुलाखतीत पीडितेच्या आईने ही खंत बोलून दाखवली.
संदीप घोष यांनी मला फोनही केला नाही
पीडितेची आई पुढे म्हणाली, “आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयचे माजी प्राचार्य संदीप घोष यांनी या घटनेनंतर मला साधा फोन करुन दिलगिरीही व्यक्त केली नाही. माझ्या मुलीला भीती होती की संदीप घोष तिला परीक्षेत नापास करतील. मी माझ्या मुलीचे शेवटचे शब्द ऐकले ते इतकेच होते की मेरा खाना आ गया है.” असं पीडितेच्या आईने सांगितलं.
माझी मुलगी तिच्या वडिलांसाठी औषध मागवणार होती
पीडितेची आई याच मुलाखतीत म्हणाली, “ज्या दिवशी माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली त्या दिवशीच तिने मला सांगितलं होतं की वडिलांसाठी औषध आणते आणि आपण एकत्र डिनर करायला जाऊ. पण यातलं काहीही घडलं नाही. कारण तिची हत्या करण्यात आली. यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. वी. आनंद बोस आमच्या घरी आले होते. त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह लगेच पाहू दिला नाही. ते लोक काहीतरी लपवत होते. त्यामुळे त्यांनी मृतदेह पाहू दिला नाही. आमच्या मुलीचा मृतदेह दाखवण्यासाठी चार तासांचा अवधी त्यांनी का घेतला?” असाही प्रश्न पीडितेच्या आईने विचारला आहे.