Kolkata Rape Case : कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातला खुनी संजय रॉयला पोलिसांनी अटक ( Kolkata Rape Case ) केली आहे. तरीही हे प्रकरण गुंतागुंतीचं झालं आहे. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण पोलिसांनी सीबीआयकडे सोपवलं आहे. सीबीआयकडे हे प्रकरण आलेलं असताना आता त्यांना या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.

सीबीआय पुढे कोणते प्रश्न आहेत

कोलकाता येथील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार ( Kolkata Rape Case ) नाही तर सामूहिक बलात्कार झाला होता का?

rape case
खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचारी तरुणीशी अश्लील वर्तन; तक्रारीनंतर कंपनीकडून प्रकरण दडपण्याचा आरोप
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
Mayni Medical College , Financial Misappropriation Mayni Medical College,
मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश
Baba Siddique murder case, Accused arrested from Ludhiana, Baba Siddique latest news, Baba Siddique marathi news,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : आरोपीला लुधियानातून अटक
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा
Notice to Ekta Kapoor Shobha Kapoor in case of web series on Alt Balaji Mumbai news
एकता कपूर, शोभा कपूरला पोलिसांकडून नोटीस, ‘अल्ट बालाजी’वरील वेबसिरीज दाखल गुन्हा प्रकरण

संजय रॉय या मुख्य आरोपीशिवाय या घटनेत इतर आरोपीही होते का?

संजय रॉय शिवाय इतर आरोपी जर या घटनेत सहभागी होते तर त्यांच्याविषयी काय माहिती मिळाली आहे?

सुवर्ण गोस्वामी यांचा दावा काय?

या प्रश्नांचं आव्हान आता सीबीआयपुढे असणार आहे. अखिल भारतीय सरकारी डॉक्टर संघाचे अतिरिक्त महासचिव डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी या प्रकरणातील महिलेच्या शवविच्छेदन ( Kolkata Rape Case ) अहवालाचा हवाला देत म्हटलं आहे की हे प्रकरण सामूहिक बलात्कार आणि हत्येचं आहे. सदर महिलेच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिच्या गुप्तांगात १५१ मिलीग्रॅम वीर्य आढळल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यावरुन हा दावा गोस्वामी यांनी केला आहे.

हे पण वाचा- आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न; राहुल गांधी यांचा कोलकात्यातील रुग्णालय प्रशासनावर आरोप

डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी आणखी काय म्हटलं आहे?

सुवर्ण गोस्वामींनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक जखमा ( Kolkata Rape Case ) होत्या. त्यांचा हवाला देत गोस्वामी म्हणाले, “ज्या प्रकारे या महिलेच्या अंगावरच्या जखमा होत्या त्या पाहून वाटत नाही की हे एकट्याचं काम असेल. या घटनेत एकापेक्षा अधिक जणांचा सहभाग असू शकतो.” हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर आता आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी हा आऱोप केला आहे की कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातले पुरावे नष्ट करण्यासाठी कट रचला. एवढंच काय तर ज्या ठिकाणी गुन्हा घडला तो तिसरा मजलाही पोलिसांनी सील केला नाही.

पोलिसांनी सेमिनार हॉल सील का केला नाही?

पोलिसांनी ज्या ठिकाणी गुन्हा घडला तो सेमिनार हॉल सील का केला नाही? ९ ऑगस्टला या ठिकाणी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळाला होता. तरीही पोलिसांनी हा भाग सील केला नाही. सेमिनार हॉलमध्ये गाद्या, टेबल, बेंच, मशीन आणि लाकडी तसंच प्लास्टिक खुर्च्या दिसत आहेत. मात्र पोलिसांनी हा हॉल सील केलेला नाही असा आरोप आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. एवढंच नाही तर पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. असाही आरोप डॉक्टरांनी केला आहे.