Kolkata Rape and Murder : कोलकाता या ठिकाणी असलेल्या आर. जी. कर महाविद्यालयात ९ ऑगस्टला एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. सीबीआयने या प्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे. ट्रेनी डॉक्टरवर संजय रॉयनेच बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली असा उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. ट्रेनी डॉक्टरवर सामूहिक बलात्काराची घटना घडलेली नाही असंही चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.

९ ऑगस्टला काय घटना घडली?

Kolkata Rape and Murder कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करणारी एक डॉक्टर ८ ऑगस्टच्या रात्री उशिरा तिची शिफ्ट संपल्यानंतर आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये आराम करण्यासाठी गेली होती. ९ ऑगस्टला सकाळी तिचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा कळलं की या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावर २५ जखमा होत्या. संजय रॉयनेच या डॉक्टरवर आधी बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) केली. तिच्या मृतदेहाची विटंबना केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये गेला होता आणि नंतर पहाटे ४.३० च्या सुमारास बाहेर आला हे स्पष्ट दिसतं आहे.

हे पण वाचा- Kolkata Doctors Strike : कोलकाता येथील संप ४१ दिवसांनी मागे, आर.जी. कर रुग्णालयाचे डॉक्टर कामावर परतणार

कोलकाता पोलिसांना घटनास्थळी मिळाला हेडफोन

कोलकाता पोलिसांना घटनास्थळी संजय रॉयचा ब्लू टूथ हेडफोन मिळाला. पीडितेच्या नखांमध्ये आणि त्वचेवर जे रक्त आढळलं त्या रक्तातही संजय रॉयचा डीएनए होता. त्यामुळे संजय रॉयनेच डॉक्टरवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली हे स्पष्ट झालं. आता या प्रकरणात सीबीआयने जे आरोपपत्र दाखल केलं आहे त्यात संजय रॉय यानेच ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) केली ही बाब नमूद करण्यात आली आहे.

पीडितेच्या आई वडिलांचा आरोप काय?

कोलकाताच्या सरकारी आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्ट रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. शवविच्छेदन अहवालातून तिच्या शरीरावर जवळपास २५ अंतर्गत आणि बाह्य जखमा असल्याचं समोर आलं होतं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने पोलिसांनी संजय रॉय या स्वयंसेवकाला अटक केली. परंतु, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना १४ तास उशीर लागला. यामध्ये रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं गेलं. मुलीने आत्महत्या केल्याचे सांगून रुग्णालयाने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला होता, असा पालकांचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर मुलीचा मृतदेह पाहण्यासाठीही पालकांना तीन तास वाट पाहावी लागली होती. या प्रकरणात सुरु असलेला संप गेल्या महिन्यांत संपला. चर्चेच्या सहा ते सात फेऱ्या संपल्यानंतर या प्रकरणातले डॉक्टर्स कामावर रुजू झाले आहेत.