Kolkata Rape and Murder : कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली. यानंतर आता त्याची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्याने त्या रात्री काय (Kolkata Rape and Murder) घडलं ते सांगितलं आहे. मात्र तो खोटं बोलत असल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

संजय रॉयने पॉलिग्राफ चाचणीदरम्यान दिली खोटी उत्तरं

संजय रॉय चाचणी होत असताना अस्वस्थ आणि चिंताग्रस्त दिसत होता. त्याने खोटी आणि न पटणारी उत्तरे दिली आहेत, असं टाइम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटलंय. दरम्यान, रॉयच्या वकील कविता सरकार यांनी दावा केला की बचाव पक्षाच्या वकिलांनी ही चाचणी केव्हा आणि कुठे केली जाईल, याची माहिती दिली नव्हती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून बचाव पक्षाचा कोणताही वकील उपस्थित राहू शकला नाही, असंही त्या म्हणाल्या.

village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Kerala Crime
Kerala Horror : धक्कादायक! दलित तरुणीवर ५ वर्षांत ६२ जणांकडून बलात्कार; पोलि‍सांनी आतापर्यंत ४४ जणांच्या आवळल्या मुसक्या
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
Unnatural sexual assault with female lawyer by husband family and in laws
महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार… न्यायाधीश असलेला सासराही…

हे पण वाचा- Kolkata Doctor Murder : विकृतीचा कळस; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून पैसे कमावण्याचा प्रयत्न; पीडितेच्या नावाने…

लाय डिटेक्टर टेस्टमध्ये काय समोर आलं?

लाय डिटेक्टर टेस्टच्या दरम्यान संजय रॉयने सीबीआयला हे सांगितलं की तो डॉक्टरच्या हत्येच्या ( Kolkata Rape and Murder ) घटनेआदी रेड लाइट एरियात गेला होता. त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र होता. तिथे जाऊन वेश्यागमन केलं नाही असं त्याने या टेस्टदरम्यान सांगितलं. मात्र त्या दिवशी एका महिलेची छेड काढली ती रस्त्यावरची महिला होती असंही संजय रॉयने सांगितलं.

संजय रॉयने गर्लफ्रेंडला मागितले होते न्यूड फोटो

संजय रॉय म्हणाला त्यादिवशी मी माझ्या गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल केला होता. तिला मी तुझे न्यूड फोटो पाठव असंही सांगितलं होतं. तसंच संजय रॉयने हेदेखील सांगितलं की त्या रात्री मी मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन केलं होतं. तसंच त्याने हेदेखील सांगितलं की रेड एरिया सोनागाछी या ठिकाणी तो त्याच्या मित्रासह गेला होता आणि त्यानंतर तो छेतला या ठिकाणी असलेल्या रेड लाईट एरियातही गेला होता. हा रेड लाईट एरिया दक्षिण कोलकात्यात आहे. या ठिकाणीही एका मुलीची छेड संजय रॉयने काढली. त्यानंतर तो हॉस्पिटलला परतला. अशी माहितीही समोर आली आहे.

पोलिसांनी संजय रॉयबद्दल काय सांगितलं?

डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर ( Kolkata Rape and Murder ) संजय रॉय त्याचा मित्र अनुपम दत्ताकडे गेला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली होती. सीबीआयच्या सूत्रांनी संजय रॉयच्या पॉलिग्राफ टेस्टबद्दल सांगितलं सांगितलं की रॉयने दावा केला की तो दारूच्या नशेत होता. त्याने चुकून पीडितेला सेमिनार हॉलमध्ये पाहिलं. त्याने हेल्मेटने दरवाजा उघडला तेव्हा त्याने पाहिलं की ती आधीच मृत ( Kolkata Rape and Murder ) झाली होती. त्यामुळे तो घाबरून पळाला.

पॉलिग्राफ टेस्टमध्ये संजय रॉय खोटं बोलल्याची माहिती

संजय रॉयला ८ आणि ९ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या घटनांविषयी वारंवार प्रश्न विचारण्यात आले. पण त्याने बहुतेक प्रश्नांची उत्तरे खोटी आणि न पटणारी दिली आहेत, असं सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलं. जर तो निर्दोष असेल तर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न का केला? पोलिसांना का कळवलं नाही? बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याच्याविरुद्ध इतके फॉरेन्सिक पुरावे का आहेत? असेही प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. दरम्यान, पुढील काही दिवसांत चार कनिष्ठ डॉक्टर आणि एका नागरी स्वयंसेवकाचीही अशाच पद्धतीने चाचणी करण्यात येणार आहे. रविवारी आणखी दोन डॉक्टरांची चाचणी होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली.

Story img Loader