Kolkata Rape and Murder : कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. कोलकाता येथील आर.जी. कर आरोग्य महाविद्यालय आणि रुग्णालयातली ही घटना आहे. यानंतर आता पीडितेच्या आई वडिलांनी त्यांना ९ ऑगस्टच्या दिवशी आलेल्या फोन कॉल्सबाबत ( Kolkata Rape and Murder ) माहिती दिली आहे.
९ ऑगस्टच्या सकाळी काय काय झालं?
उत्तर कोलकाता भागातला मध्यमवर्गीय घरातला दिवस होता. या घरातली डॉक्टर मुलगी तिच्या शिफ्ट ड्युटीसाठी आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात गेली होती. ९ तारीख येण्याआधी म्हणजेच ८ तारखेच्या रात्री साधारण ११.३० ला या मुलीने तिच्या आई वडिलांना फोन केला, तिचा यावेळी कॉल येतो हे आई वडिलांना माहीत होतं. पण हा तिचा शेवटचा कॉल असेल हे त्यांना ठाऊक नव्हतं. यानंतर ९ ऑगस्टची सकाळ उगवली. ९ ऑगस्टची सकाळ उजाडल्यानंतर ते तीन कॉल याच घरात आले ज्यामुळे पीडितेचे आई वडील हादरुन गेले. ३१ वर्षाच्या डॉक्टर मुलीवर बलात्कार झाला आणि तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. काय घडलं आहे ते समजण्याआधी पीडितेच्या आई वडिलांना तीन फोन आले.
पहिला फोन काय आला होता?
( Kolkata Rape and Murder ) सकाळी १०.५३ ला पहिला फोन आला. मी हॉस्पिटलमधून बोलतो आहे असं त्या माणसाने पीडितेच्या आई वडिलांना सांगितलं. सर्वोच्च न्यायालयातही ही माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या उप अधीक्षकांनी फोन करुन पीडितेच्या आई वडिलांना माहिती दिली की तुमच्या मुलीबरोबर काहीतरी घडलं आहे. हा फोन ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.
ते संभाषण काय होतं?
पीडितेचे वडील : “काय घडलं ते कृपा करुन सांगा”
कॉलर : “तुमच्या मुलीची अवस्था खूप वाईट आहे, तुम्ही लवकर रुग्णालयात या.”
पीडितेचे वडील : “कृपा करुन सांगा काय झालंय?”
कॉलर : “डॉक्टर तुमच्याशी बोलतील तुम्ही लवकर या”
पीडितेचे वडील : “तुम्ही कोण बोलत आहात?”
कॉलर : “मी असिस्टंट बोलतो आहे, मी डॉक्टर नाही.”
पीडितेचे वडील : “तिथे डॉक्टर नाहीत का?”
कॉलर : “मी असिस्टंट आहे. तुमच्या मुलीला अतिदक्षता विभागात ठेवलं आहे, तुम्ही या आणि आमच्याशी संपर्क करा.”
पीडितेचे वडील: “ती ड्युटीवर गेली होती, नेमकं काय घडलंय?”
कॉलर : “तुम्ही लवकर इथे निघून या.”
दुसऱ्या कॉलमध्ये काय संभाषण?
कॉलर : “मी आर. जी. कर रुग्णालयातून बोलतो आहे.”
पीडितेची आई : “हो, बोला.”
कॉलर : “तुम्ही रुग्णालयात पोहचता आहात ना?”
पीडितेची आई : “हो, आम्ही येत आहोत, आमची मुलगी कशी आहे?”
कॉलर : “तुम्ही या, आमच्याशी बोला. लवकर आर. जी. कर रुग्णालयात पोहचा.”
पीडितेची आई : “बरं, आम्ही पोहचत आहोत.”
तिसरा फोन कॉल
तिसऱ्या फोन कॉलमध्ये आई वडिलांना हे सांगण्यात आलं की तुमच्या मुलीने आत्महत्या ( Kolkata Rape and Murder ) केली आहे. असिस्टंट सुपरिटेंडंट यांनी पहिला कॉल केला होता त्यांनीच पुन्हा कॉल केला.
पीडितेचे वडील : “हॅलो”
कॉलर : “मी असिस्टंट बोलतो आहे”
पीडितेचे वडील : “हो बोला.”
कॉलर : “तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असं प्राथमिकदृष्ट्या कळतं आहे. तिचा मृत्यू ( Kolkata Rape and Murder ) झाला आहे. आम्ही सगळे इथे आहोत. तुम्ही लवकर रुग्णालयात या.”
पीडितेचे वडील : “आम्ही येत आहोत, वाटेतच आहोत.”
पीडितेची आई : किंचाळून म्हणाल्या “माझी मुलगी राहिली नाही”
हे तीन कॉल या मुलीच्या आई वडिलांना आले होते. त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. जेव्हा या घटनेबाबत मुलीच्या आई वडिलांनी सांगितलं की आम्हाला रुग्णालयात फोन करुन बोलवण्यात आलं पण नंतर तीन तास ( Kolkata Rape and Murder ) वाट बघायला लावली. मुलीला पाहूही दिलं नाही.