Kolkata Rape Case : कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली ( Kolkata Rape Case ) . ऑगस्ट महिन्यात हे प्रकरण ( Kolkata Rape Case ) घडलं होतं. जे देशभरात चर्चेत राहिलं. या प्रकरणातल्या दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआय चार्जशीट दाखल करण्यात अपयशी ठरल्याने सेलदाह येथील न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायालयाने कुणाला जामीन मंजूर केला?

सेलदाह न्यायालयाने महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष आणि ताला पोलीस स्टेशनचा माजी पोलीस अधिकारी अभिजित मोंडोल या दोघांना जामीन मंजूर केला आहे. सीबीआय आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात ९० दिवस उलटून गेल्यावरही अपयशी ठरलं त्यामुळे हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना सेलदाह न्यायलायने २ हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयने चौकशीसाठी बोलवल्यानंतर या दोघांनाही चौकशीसाठी यावं लागेल या अटीवरच जामीन मंजूर करण्यात आला आहे. संदीप घोषला या प्रकरणात जामीन मिळाला असला तरीही तो तुरुंगातच राहणार आहे. कारण आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील आर्थिक गैरव्यहार प्रकरणात त्याला जामीन मिळालेला नाही.

काय घडली होती घटना?

कोलकाता येथील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या ( Kolkata Rape Case ) करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. ९ ऑगस्ट २०२४ या दिवशी हे प्रकरण समोर आलं. यानंतर सुमारे दीड महिना ट्रेनी डॉक्टर संपावर होते. या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मुख्य आरोपी संजय रॉयला अटक केली. या अटकेनंतर दोनच दिवसात संदीप घोषला अटक करण्यात आली. संदीप घोषवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप आहे. तर मोंडोलवर या प्रकरणात उशिरा एफआयआर दाखल केल्याचा आरोप आहे.

हे पण वाचा- Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?

पीडितेच्या आईने काय म्हटलं आहे?

सालदाह न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर ( Kolkata Rape Case ) केला आहे कारण सीबीआयने चार्जशीट दाखल केली नाही. ही बाब चिंताजनक आहे.

आंदोलक डॉक्टरांनी काय भूमिका मांडली आहे?

पीडितेला न्याय मिळावा म्हणून जे डॉक्टर आंदोलन करत होते त्यांच्यापैकी उत्पल बंडोपाध्याय यांनी असं म्हटलं आहे की न्यायलयाचा हा निकाल धक्कादायक आहे. या निर्णयामुळे पीडितेच्या कुटुंबाला काय वाटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. आम्ही त्यांच्या बरोबर आजही ठामपणे उभे आहोत. आम्हाला सीबीआयने चार्जशीट का दाखल केली नाही ते समजलं पाहिजे ते कारण योग्य नसेल तर आम्ही पुन्हा आंदोलन करु असाही इशारा बंडोपाध्याय यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata rape case and murder sealdah court grants bail to sandip ghosh abhijit mondol as cbi fails to submit chargesheet scj