Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशा घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या आईने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत संजय रॉय कोणालाही इजा न पोहोचवणारा होता, असं म्हटलंय. तसंच, तिने अजून कडक राहायला हवे होते अशी खंतही व्यक्त केली आहे.
मी त्याच्याशी कठोरपणे वागले असते तर हा प्रकार घडला नसता. त्याचे वडील स्वभावाला फार कठोर होते. त्यामुळे तो त्यांचा आदर करायचा. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मी सर्व काही गमावले. माझं सुंदर कुटुंब हे माझ्यासाठी एक स्वप्न उरलंय”, असं आरोपी संजय रॉयच्या आईने म्हटलं आहे.
संजय रॉय प्रभावाखाली
“मला कळत नाहीय की असं काही करण्यासाठी त्याला कोणी प्रभावित केले. जर कोणी त्याला फसवलं असेल तर त्याला शिक्षा होईल”, असंही त्याने पुढे स्पष्ट केलं. त्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार संजय रॉयला खेळात फार रस होता. तो बॉक्सिंग शिकत होता. शाळेत असताना तो एनसीसीचा भाग होता.
तो माझ्यासाठी स्वंयपाक करायचा
“तो माझी काळजी घ्यायचा. माझ्यासाठी स्वंयपाक करायचा. तुम्ही आमच्या शेजाऱ्यांना विचारू शकता, त्याने कधीच कोणाशीच गैरवर्तन केले नाही”, असंही त्याच्या आईने म्हटलं आहे. मी त्याला भेटले तर त्याला विचारणार आहे की, ‘बाबू तू असं का केलंस?’ कारण तो असा कधीच नव्हता.
संजय रॉय आरजी. कर रुग्णालयात जात होता हेही त्याच्या आईला माहीत नव्हतं. याबाबत त्याची आई म्हणाली, तो आरजी. कार रुग्णालयात जात होता हे मला माहीत नव्हतं. त्यादिवशी रात्री तो जेवलाही नाही”, अशी माहिती देत तो वैश्यांकडे जात असलेल्या वृत्तांनाही तिने फेटाळून लावलं.
संजय रॉय घटना घडायच्या आधी उत्तर कोलकाता येथील रेड लाईट विभागातही गेला होता, असं वृत्त आहे. तसंच, त्याला पॉर्न पाहण्याची सवय होती आणि त्याच्या मोबाईलमध्ये असे असंख्य क्लिप्स सापडल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे, असे वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
बायकोचं निधन झाल्यापासून तो दारू प्यायला लागला
“संजय रॉयच्या पहिल्या बायकोचं कर्करोगाने निधन झालं. त्याची पहिली बायको खूप चांगली होती. ते खूप आनंदी होती. परंतु, अचानक तिला कर्करोगाच निदान झालं. त्यामुळे त्याच्या बायकोचं निधन झाल्यापासून तो दारू प्यायला लागला”, असं त्याच्या आईने सांगितलं. रॉयची चार लग्न झाल्याचीही चर्चा आहे.
“मला माझ्या मुलींनी आणि जावयांनी सोडून दिलंय. कोर्टात याचिका कशी करतात हेही मला माहीत नाही. मी एकटी आहे”, असंही त्याची आई म्हणाली.