Kolkata Rape Case Update : कोलकाताच्या आरजी. कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटत असून विविध सामाजिक संस्थांकडून आंदोलन पुकारले जात आहे. तसंच, महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून या रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनीही आंदोलन छेडलं होतं. परंतु, मध्यरात्री या आंदोलनात इतर जमावाने सहभाग घेऊन आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. या घटेनेचे वर्णन करताना रुग्णालयातील परिचारिकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीच्या तळमजल्यावर रात्री हिंसाचार झाला. या हिंसाचारात तोडफोड झाल्याने रुग्णालयातील काचा फुटल्या, वैद्यकीय उपकरणे खराब झाली, बेड तुटले, औषध खोल्यांमध्ये नासधूस झाली. १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर शेकडो लोक रुग्णालयात पोहोचले. त्यांनी आंदोलकांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते आपत्कालीनच्या इमारतीत घुसले. तिथे लाठ्या आणि हातोड्यांचा वापर करून तळमजल्यावरील खोल्यांची तोडफोड केली. पोलिस त्यांच्या मदतीला आले नाहीत, असे आंदोलकांनी सांगितले.

Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…
Gang rape of a minor girl vasai crime news
वसई: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
notorious chhota rajan granted bail by bombay high court
जया शेट्टी हत्या प्रकरण;कुख्यात छोटा राजनला उच्च न्यायालयाकडून जामीन;व्यावसायिक अन्य प्रलंबित खटल्यांमुळे तुरुंगातच मुक्काम
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
What Vinesh Phogat Said?
Vinesh Phogat : साक्षी मलिकच्या आरोपांना विनेश फोगटचं उत्तर, “जर स्वार्थ….”
Complaint of molestation of a minor child in a juvenile detention center Mumbai
बाल निरीक्षणगृहात अल्पवयीन मुलावर अत्याचाराची तक्रार ; अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा

आम्ही दहशतीत आहोत

“आमच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला झाला. पोलीस आमच्यापेक्षा वेगाने पळून गेले. गुंडांनी आमच्यापैकी काहींना मारहाण केली आणि परिसराची तोडफोड केली. आम्ही दहशतीत आहोत. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचा निषेध करण्याची भावना अजूनही शाबूत आहे”, असं असे विरोध करणाऱ्या डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

कोलकाता आणि राज्यातील इतर शहरांत रिक्लेम द नाईट या मोहिमेअंतर्गत शेकडो महिला एकत्र जमल्या होत्या. नेमकं याच वेळी जमावाने धुडगुस घातला. आपत्कालीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार रूममध्ये गेल्या आठवड्यात ३१ वर्षीय डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी पहाटे इमारतीत घुसलेला जमाव या चौथ्या मजल्यापर्यंत गेला नाही.

हेही वाचा >> Kolkata Rape Case : बॅरिकेट्स तोडले, खुर्च्या फोडल्या, जबरदस्तीने रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न; कोलकात्यातील रुग्णालयात मध्यरात्री जमावाचा धुडगूस!

संपूर्ण रुग्णालयात हैदोस

तळमजल्यावर, कार्डिओलॉजी आपत्कालीन विभाग, प्रवेश कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष, टेली-न्यूरो मेडिसिन कक्ष, परिचारिकांचा कक्ष आणि आपत्कालीन वॉर्डांची तोडफोड करण्यात आली. लाइफ सपोर्ट सिस्टिमसह अत्याधुनिक उपकरणांचे नुकसान झाले. चोरट्यांनी स्टोअररुममध्ये घुसून औषधे असलेली उघडी तिजोरी फोडली. ईएनटी विभागाचीही तोडफोड करण्यात आली.

सर्व खोल्यांमध्ये डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप, दिवे आणि पंखे तुटले. स्नानगृहे उद्ध्वस्त झाली. रुग्ण आणि त्यांच्या सेवकांसाठी असलेल्या खुर्च्या आणि बेडचीदेखील तोडफोड करण्यात आली. तोडफोड करत असताना आंदोलनस्थळी असलेले डॉक्टर म्हणाले, “गेल्या सहा दिवसांपासून आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. आमच्या मदतीला न आलेल्या पोलिसांना आम्ही मदतीसाठी हाक मारली. बदमाशांनी आम्हालाच लक्ष्य केले.”

या निषेधात सहभागी असलेली एक परिचारिका म्हणाली, “आम्ही काल रात्री असहाय होतो. आम्ही असे कसे काम करणार? प्रशासन आणि पोलिसांनी आमची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. ”