Kolkata Rape Case Doctor’s Mother Wrote Letter : आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील बलात्कार व हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो तपास करत आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसे याप्रकरणाचे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. दरम्यान, मृत तरुणीच्या आईने शिक्षक दिनी एक पत्र लिहून त्यांच्या मुलींच्या शिक्षकांचे आभार मानले आहे. तसेच न्यायासाठी चालू असलेल्या लढाईत जास्तीत जास्त लोकांचं सहकार्य मिळावं यासाठी लोकांना आवाहन केलं आहे. त्यांनी पत्रात लिहिलं आहे की माझ्या मुलीला चांगले शिक्षक लाभले. त्यामुळेच ती इथवरचा प्रवास करू शकली. तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही लढत आहोत. मात्र काही चांगल्या लोकांनी मौन बाळगल्याने गुन्हेगारांचं मनोबल वाढतंय.

पीडितेच्या आईने पत्रात लिहिलं आहे की “मी निर्भयाची (बदललेलं नाव) आई आहे. आज शिक्षक दिनानिमित्त मी माझ्या मुलीतर्फे तिच्या सर्व शिक्षकांचे आभार मानते. तिला लहानपणापासूनच डॉक्टर बनायचं होतं. तेच स्वप्न पाहत ती मोठी झाली. तिचे सर्व शिक्षक तिच्यासाठी प्रेरणास्थान होते. तिला डॉक्टर बनवण्यासाठी आमच्याइतकीच तिच्या शिक्षकांनीदेखील मेहनत घेतली होती. तुमच्यासारख्या शिक्षकांमुळेच ती तिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं, तिला पदवी मिळाली. माझी लेक म्हणायची, आई मला आता पैशांची आवश्यकता भासणार नाही. मला केवळ माझ्या नावाच्या पुढे अनेक पदव्या हव्या आहेत. मी खूप रुग्णांना बरं करेन”.

Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mumbai rape marathi news
मुंबई : बलात्कार प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
Sandip Ghosh, former principal of R G Kar Medical College and Hospital, and Abhijit Mondol former OC of Tala police.
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोन आरोपींना जामीन, सीबीआयकडून चार्जशीट दाखल नसल्याने निर्णय
allu arjun shah rukh khan
अल्लू अर्जुनच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात का घेतले शाहरुख खानचे नाव? जाणून घ्या
varun dhawan reaction on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया, अभिनेता म्हणाला, “घडलेली घटना दुर्दैवी, पण त्याचा दोष…”
RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी

त्यांनी पत्रात लिहिलं आहे की एक आई म्हणून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील शिक्षक, डॉक्टर, आरोग्य अधिकारी, नर्सिंग स्टाफला माझी विनंती आहे की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती किंवा पुरावे असतील तर ते पोलिसांना द्या. मला वाटतं की काही चांगल्या लोकांनी मौन बाळगल्याने गुन्हेगार व त्यांना वाचवू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचं मनोबल वाढतं. वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्यांच्यामुळे मला न्याय मिळेल असं वाटतं. मात्र आज या शिक्षक दिनी मला माझ्या मुलीच्या शिक्षकांना नमन करायचं आहे.

हे ही वाचा >> Ujjain Rape Case : इथे माणुसकी थिजली! महिलेवर बलात्कार होत होता अन् लोक तिला वाचवण्याऐवजी व्हिडीओ चित्रित करत बसले

आंदोलकांचे गंभीर आरोप

कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. दरम्यान, या प्रकरणात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. घटना घडली त्या दिवशी रुग्णालयात असलेल्या एका डॉक्टरने आरोप केला आहे की, पोलिसांनी क्राईम सीनशी (घटना घडली ती जागा) छेडछाड केली आहे. पोलीस या प्रकरणी चुकीची माहिती सादर करत आहेत. तसेच शवविच्छेदन दुसऱ्या कुठल्या तरी रुग्णालयात करायला हवं होतं. जेणेकरून या प्रकरणाची पारदर्शकता वाढली असती. मात्र या सगळ्याच गोष्टी आर. जी. कर रुग्णालयात केल्या. मुळात येथील अधिकारी आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

Story img Loader