Kolkata Rape Murder Case Adhir Ranjan Chowdhury : पश्चिम बंगालमधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेने देश हादरून गेला आहे. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवरून राजकीय वातावरणही तापलं आहे. बलात्कार व खुनाचं हे प्रकरण, त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई, पश्चिम बंगालमधील महिला सुरक्षेचा मुद्दा यावरून भारतीय जनता पार्टी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर, राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर सातत्याने नवनवे आरोप करत आहे. अशातच आता तृणमूल काँग्रेसचा मित्रपक्ष (इंडिया आघाडी) असलेल्या काँग्रेसने ममता सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोठा दावा केला आहे. चौधरी म्हणाले, “कोलकाता पोलिसांनी मृत डॉक्टर तरुणीच्या आई-वडिलांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवलं आहे. मी मृत डॉक्टरच्या घरी जऊन तिच्या कुटुंबीयांशी बातचीत केली. पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. पोलीस वेगवेगळी कारणं पुढे करून मृत तरुणीच्या आई-वडिलांना घराबाहेर पडू देत नाहीत. पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर चोहोबाजूने बॅरिकेड्स लावले आहेत. विशेष म्हणजे, सीआयएसएफला (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) याबाबत कोणतीही कल्पना नाही”.

हे ही वाचा >> Narendra Modi : बदलापूर-कोलकाता प्रकरणांवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; सरन्यायाधीशांसमोर म्हणाले, “जितक्या लवकर…”

“पीडितेच्या पित्याला पैसे देऊन मृतेहावर अंत्यसंस्कार करायला लावण्याचा प्रयत्न”, चौधरींचा आणखी एक आरोप

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार अधीर रंजन चौधरी यांनी दावा केला आहे की “तृणमूल काँग्रेस सरकारच्या आदेशांनंतर काही लोकांनी पीडितेच्या वडिलांना पैसे देऊ केले व त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करा”. दरम्यान, चौधरी यांनी आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना महाविद्यालयात जाण्यास मज्जाव केला. महाविद्यालयात आंदोलन करणाऱ्या कनिष्ठ व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची भेट घेण्यासाठी चौधरी तिथे गेले होते. मात्र पोलिसांनी रोखल्यामुळे ते आंदोलकांना भेटू शकले नाहीत.

हे ही वाचा >> Haryana Mob Lynching : गोमांस खाल्ल्याच्या संशयातून बेदम मारहाण करत मजुराची हत्या; एकजण गंभीर, सात आरोपी गजाआड

…तर आमची डॉक्टर बहीण जीवंत असती : अधीर रंजन चौधरी

काँग्रेसचे माजी खासदार चौधरी म्हणाले, मी एक सामान्य नागरिक म्हणून तिथे गेलो होतो. परंतु, पोलिसांनी मला आंदोलक डॉक्टरांची भेट घेऊ दिली नाही. पोलिसांनी यापूर्वीच सजग राहून त्यांचं काम केलं असतं, त्यांचं कर्तव्य बजावलं असतं, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली असती तर आज आमची डॉक्टर बहीण जीवंत असती, तिची अशी अवस्था झाली नसती.