Kolkata Rape and Murder : कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले आहेत. अजूनही या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. एवढंच नाही तर इथल्या महिला डॉक्टर या भीतीच्या विळख्यात आहेत.
नेमकी घटना काय घडली?
९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ( R.G. Kar Hospital ) सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा ( Kolkata Rape and Murder ) होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या ( Kolkata Rape and Murder ) करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे.
विद्यार्थिनींने काय सांगितलं?
“आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय परिसरात ९ ऑगस्ट पूर्वी आम्ही साधारण १६० जणी होतो. आता आम्ही फक्त १७ जणी उरलोय” रुग्णालय परिसरातील २४ वर्षीय विद्यार्थिनीने ही माहिती दिली. बलात्कार आणि हत्येच्या( Kolkata Rape and Murder ) घटनेने मुलींच्या मनात भीती बसली आहे. मुली आणि महिला डॉक्टर प्रचंड दहशतीखाली आहेत असं तिने सांगितलं.
ज्युनिअर डॉक्टरने नेमकं काय सांगितलं?
आणखी एका ज्युनिअर डॉक्टरने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर( Kolkata Rape and Murder ) या ठिकाणी असलेल्या नर्सिंग हॉस्टेलमध्ये काही मुली आहेत. इतर हॉस्टेल जवळपास ओस पडली आहेत. सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. ही घटना ९ ऑगस्टला उघडकीस आली. त्यानंतर या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी आणि इतर महिला डॉक्टरांनी रुग्णालयाची वसतिगृहं सोडण्यास सुरुवात केली. आणखी एका डॉक्टरने सांगितलं, “आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मुली आणि महिलांसाठी पाच वसतिगृह आहेत. मात्र सध्याच्या घडीला या ठिकाणी फक्त १७ जणी उरल्या आहेत. ९ ऑगस्टच्या घटनेनंतर मुली आणि महिलांनी हॉस्टेल सोडण्यास सुरुवात केली. काही मुली परत आल्या होत्या. मात्र १४ ऑगस्टनंतर हॉस्टेल्स ओस पडण्यास सुरुवात झाली.”
हे पण वाचा- “संजय रॉय आधी रेड लाईट एरियात गेला आणि…”, कोलकाता प्रकरणातील आरोपीबाबत माहिती समोर
१४ ऑगस्टची ती रात्र भयंकर होती
१४ ऑगस्टला आम्ही सगळ्या जणी खूप घाबरलो होतो. अनेक आंदोलनकर्त्यांवर त्या दिवशी रात्री हल्ला झाला. जो अनुभव आला तो अजूनही मनातून जात नाही. आमच्यापैकी कुणीही त्या रात्री झोपलं नाही. आम्ही न्याय मागत होतो, मात्र आमच्यावर हल्ला करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडत वकील अपराजिता सिंग यांनी ही माहिती दिली की या रुग्णालयात साधारण ७०० निवासी डॉक्टर होते. जी संख्या आता फक्त १०० वर आली आहे. त्यापैकी साधारण ७० पुरुष आहेत आणि ३० महिला आहेत.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १५० CISF जवान तैनात करण्यात आले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd