Kolkata Rape-Murder : कोलकाता येथील आर.जी. कर रुग्णालयात डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या ( Kolkata Rape-Murder ) करण्यात आली. मागच्या महिन्यात ९ ऑगस्टला ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. पीडितेच्या आई वडिलांनी सदरचं प्रकरण दडपण्यासाठी आम्हाला पैसे देऊन गप्प करण्याचा आरोप झाला असं म्हटलं आहे. तर पीडितेच्या आईने थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केला आहे.

९ ऑगस्टला काय घटना घडली?

९ ऑगस्टला कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयाच्या सेमीनार हॉलमध्ये डॉक्टर महिलेचा मृतदेह (Kolkata Rape-Murder ) छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. पहाटे साधारण अडीच ते साडेपाच या कालावधीत संजय रॉय याने या ठिकाणी येऊन महिला डॉक्टरवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या ( Kolkata Rape-Murder) केली. या प्रकरणानंतर सुरु झालेली आंदोलनं अजूनही सुरु आहेत. त्याने भरपूर मद्यपान केलं होतं. तसंच या डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्याआधी तो सोनागाछी या ठिकाणी असलेल्या वेश्यावस्तीतही गेला होता. या प्रकरणात आता पीडितेच्या आईने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केला आहे.

हे पण वाचा- Kolkata Rape and Murder : कोलकाता पीडितेच्या हत्येआधीचे काही तास कसे होते? सहकाऱ्यांनी काय सांगितलं?

काय म्हटलं आहे पीडितेच्या आईने?

“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खोटं बोलत आहेत, आम्हाला त्या म्हणाल्या तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देऊ. तसंच तुमच्या मुलीच्या स्मरणार्थ काहीतरी स्मारक वगैरे उभारु. मी त्यांना सांगितलं माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. ममता बॅनर्जी म्हणाल्या तुम्ही कार्यालयात या आणि नुकसान भरपाई घेऊन जा.” असं पीडितेच्या आईने म्हटलं आहे. तसंच ममता बॅनर्जींनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप पीडितेच्या आईने केला.

ममता बॅनर्जींनी आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला

पीडितेची आई म्हणाली, “ममता बॅनर्जींनी माझ्या मुलीच्या हत्येनंतर ( Kolkata Rape-Murder ) जी आंदोलनं सुरु झाली ती दडपण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलीचा अर्धनग्न मृतदेह आम्हाला दाखवण्यात आला. आता ममता बॅनर्जी या आंदोलनं थांबवण्याचं आवाहन करत आहेत आणि दुर्गा पूजेच्या तयारीला लागा सांगत आहेत, ममता बॅनर्जींचं हे वागणं माणुसकीला धरुन नाही. मी एका मुलीची आई आहे, मी माझी मुलगी गमावली. आता दुर्गा पूजेच्या महोत्सवासाठी लोकांना यायचं तर येऊ द्या पण माझ्या मुलीला न्याय ( Kolkata Rape-Murder ) मिळायला हवा.” असं पीडितेच्या आईने म्हटलं आहे.

माझ्या घरातही दुर्गा पूजा होते

“माझ्या घरातही दुर्गा पूजा केली जाते, मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीही दुर्गा पूजा करत होतो. मात्र या एका घटनेने आमचं आयुष्य अंधकारमय झालं आहे. आता मी लोकांना कसं सांगू की यावेळी मी उत्सव साजरा करणार आहे? देव न करो पण, आज मी ज्या प्रसंगातून जाते आहे त्यातून जर आपल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या असत्या तर त्यांनी काय केलं असतं?” असा सवाल पीडितेच्या आईने केला आहे.