RG Kar Rape And Murder Case : कोलकाता येथील आरजी.कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉयला सियालदह सत्र न्यायालयाने आज दोषी ठरवलं. आता संजय रॉयला सोमवारी शिक्षा ठोठावली जाणार आहे. कोलकात्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर सुमारे सहा महिन्यांनी मुख्य आरोपी संजय रॉयला गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. आता २० जानेवारी रोजी संजय रॉयला न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे. त्यामुळे संजय रॉयला नेमकी काय शिक्षा ठोठावण्यात येते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आरजी.कर रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवल्यानंतर संजय रॉयने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. “मला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. मात्र, मी निर्दोष आहे, या प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्याचा हात आहे”, असा आरोप आरोपी संजय रॉयने केला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? विचारताच पोलीस अधीक्षकांचं उत्तर; म्हणाले, “मी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Santosh Deshmukh muder case
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका, वाल्मिक कराडचे काय?
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Santosh Deshmukh murder case
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपी भिवंडीत आले? भिवंडीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी नेमकं काय सांगितलं?

संजय रॉयने नेमकं काय म्हटलं?

रिपोर्टनुसार, आरोपी संजय रॉयने म्हटलं की, “मी असं काहीही केलेलं नाही. मला यात गोवण्यात आलं. मात्र, ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना सोडून दिलं जात आहे. यामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश आहे. मी नेहमी गळ्यात रुद्राक्षाची माळ घालतो. मी गुन्हा केला असता तर घटनास्थळी माझ्या गळ्यातील माळ तुटली असती. मी हा गुन्हा करू शकत नाही”, असं संजय रॉयने म्हटलं आहे. दरम्यान, आज सियालदह सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवल्यानंतर आरोपी संजय रॉयची कोठडीत रवानगी करण्यात आली. आता सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तसेच या खटल्याच्या सुनावणीसाठी दुपारी १२.३० वाजताची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ९ ऑगस्ट रोजी सकाळी एक महिला डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. त्यावेळी तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले होते. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा होत्या. आरोपीने या डॉक्टरवर आधी बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली. तसेच मृतदेहाची विटंबना केली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

Story img Loader