कोलकतामधून एक धक्कादायक बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कोलकताहून इंडिगो विमानाने मुंबईच्या दिशेनं उड्डाण केलं. त्यानंतर काही वेळात विमानात तांत्रिक बिघाड झाला. या विमानातून १५६ नागरिक प्रवास करत होते. इंडिगो विमानाने शुक्रवारी दहा वाजताच्या सुमारास कोलकताहून मुंबईकडे उड्डाण घेतली. विमान आकाशात गेले असताना अचानक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं एकच खळबळ उडाली. मात्र, वैमानिकाने या गंभीर समस्येबाबत एटीसीला सूचना दिली. त्यानंतर वैमानिकाने मुंबईच्या दिशेनं निघालेलं विमान पुन्हा कोलकता विमानतळावर लॅंड केलं.
आणखी वाचा – “मी तृतीयपंथी आहे”, महिलेनं गुपित सांगितल्यावर चिमुकल्यांना बसला धक्का, पाहा Viral Video
याबाबत सविस्तर वृत्त असं की, कोलकताहून मुंबईच्या दिशेनं उड्डाण केलेल्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाला. या तांत्रिक अडचणीबाबत वैमानिकाला समजल्यानंतर त्याने तातडीनं विमान कोलकता विमानतळावर लॅंड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे इंडिगो विमान यु टर्न मारून पुन्हा कोलकता विमानतळावर पोहोचले. या संपूर्ण घटनेची इंजीनियर्स टीमकडून चौकशी केली जात आहे. हा तांत्रिक बिघाड कशामुळे झाला, याबाबत माहिती मिळवण्याचं काम सुरु आहे.
मागील काही दिवसांपासून इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड होत असल्याचं समोर येत आहे. ऑक्टोबर मध्ये दिल्लीहून बंगळुरुला निघालेल्या इंडिगो विमानाच्या इंजिनला आग लागली होती. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर इंजिनला आग लागली होती. त्यानंतर तातडीनं विमानाची लॅंडींग केली होती आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. हा अपघात इंडिगोच्या विमानाला (6E2131) झाला होता. ही घटना तांत्रिक बिघाडमुळं झाली, असं इंडिगोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं.