राजस्थानच्या कोटा या ठिकाणी देशभरातले विद्यार्थी परीक्षांच्या तयारीसाठी येत असतात. रविवारी दुपारी नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील अविष्कार कासले (१७ वर्षे) हा विद्यार्थी कोटा या ठिकाणी शिक्षण घेत होता. रविवारी अविष्कारने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उजना गावातल्या सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

अविष्कारचे आई वडील शिक्षक

अविष्कारचे आई आणि वडील हे दोघंही शिक्षक आहेत. अहमदपूरमध्ये ते वास्तव्य करतात. यांचा मोठा मुलगा आणि अविष्कारचा मोठा भाऊ हैदराबादमध्ये शिक्षण घेतो. मोठ्या मुलाचं शिक्षणही कोटामधून पूर्ण झालं. त्यानंतर अविष्कारही कोटा या ठिकाणी शिक्षणासाठी गेला होता. अविष्कारने आत्महत्या का केली ? हे अद्याप समोर आलेलं नाही. अविष्कारने दुपारी ३.१५ च्या सुमारास जवाहर नगर कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

रूग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आधी अविष्कारचा मृत्यू

अविष्कारने जेव्हा उडी मारल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचण्याआधीच अविष्कारने जीव सोडला. अविष्कारने आत्महत्या केल्याची माहिती मिळातच त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला. आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा अविष्कारचा मृतदेह त्याच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे.

हे पण वाचा- सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेला फ्लॅट ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला विकत? तीन वर्षांपासून होता बंद

अविष्कारच्या आत्महत्येच्या चार तासानंतर कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आदर्श राज (१८ वर्षे) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. आदर्शने रविवारी संध्याकाळी सात वाजता कुन्हाडी येथील आपल्या घरात फाशी घेत आत्महत्या केली. आदर्शची बहीण आणि चुलत भाऊ संध्याकाळी साडेसात वाजता फ्लॅटवर पोहचले तर दरवाजा आतून बंद होता. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळी लटकलेल्या अवस्थेत होत्या. आदर्शला लगेच खाली उतरवण्यात आले परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याने प्राण सोडले. कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. पण आता कोटाच्या सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय.