Kota Tragedy : राजस्थानमधील कोटा येथे एक दुःखद घटना समोर आली आहे. आसाममधील नागाव येथील NEET चा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थीने बुधवारी आत्महत्या केली. विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या महावीर नगर भागातील राहत्या घरी आढळून आला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकाच दिवशी नोंदवण्यात आलेली ही दुसरी घटना आहे आणि कोटामध्ये महिन्यातील सहावी आत्महत्या आहे. त्याचदिवशी गुजरातमधील अहमदाबाद येथील NEET परीक्षार्थी अफशा शेख हिचाही मृतदेह जवाहर नगर परिसरात तिच्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी ती कोटा येथे गेली होती. शवविच्छेदन तपासणीचे आदेश देण्यात आले असून, तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

७ जानेवारी रोजी आयआयटी जेईई प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या १९ वर्षीय नीरजने सर्वप्रथम आत्महत्या केली. तर दुसऱ्या दिवशी, २० वर्षीय अभिषेकचा मृतदेह सापडला, जो जेईई परीक्षार्थी देखील होता. १६ जानेवारी रोजी, एका १८ वर्षीय तरुणाचाही मृतदेह सापडला. त्यानंतर त्याच्या जेईई परीक्षेच्या चार दिवस आधी आणखी एका १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. गेल्या वर्षी कोटामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांना वगळून १७ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. २०२३ च्या तुलनेत ही ३८ टक्के घट होती, ज्यात २३ प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

शिक्षणमंत्र्यांनी काय सांगितलं होतं?

यापूर्वी राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी म्हटले होते की, शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागे ‘प्रेमप्रकरण’ हे एक कारण आहे. त्यांनी पालकांना त्यांच्या मुलांच्या सवयी आणि ठावठिकाणाविषयी जागरुक राहून परीक्षेसाठी अवाजवी दबाव न टाकण्याचे आवाहन केले.

“माझ्या शब्दांमुळे काही लोकांना त्रास होत असला तरी मी प्रामाणिकपणे विनंती करू इच्छितो की पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि त्यांनी आपल्या मुलांवर दबाव आणू नये”, असं ते म्हणाले. “प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतःचे स्वारस्य असते आणि जेव्हा त्यांच्या आवडीच्या विरुद्ध क्षेत्रात ध्येयाचा पाठलाग करण्यास भाग पाडले जाते आणि अपयशी ठरते तेव्हा ते नैराश्यात बुडतात”, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दिलावर म्हणाले की, काहींना विज्ञानात तर काहींना इतर विषयात रस आहे आणि सर्व मुलांची क्षमता सारखी नाही. प्रत्येकाची मानसिक क्षमता सारखी नसते. तरीही मुले पालकांसाठी प्रयत्न करतात पण पालक त्यांना सतत विचारतात की तुमचा दर्जा काय आहे? तुमचा दर्जा काय आहे?” तो म्हणाला.