मथुरेतली शाही ईदगाह मशीद कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे, असा दावा करत हिंदू संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत. यासंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (२२ सप्टेंबर) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. शाही ईदगाह मशिदीतील वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल द्यावा. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला या वैज्ञानिक सर्वेक्षणाबाबत निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने सुप्रीम कोर्टात शाही ईदगाह मशिदीचं वैज्ञानिक सर्वेक्षण करावं अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. तसेच न्यायमूर्ती म्हणाले की हा उच्च न्यायालयाचा विषय आहे. तिथेच यासंबंधीचा खटला चालवावा. तसेच तिथे यासंबंधीची इतर प्रकरणं प्रलंबित आहेत. आम्ही सध्या या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही.

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती ट्रस्टने अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ विधीज्ञ सार्थक चतुर्वेदी यांनी ट्रस्टची बाजू मांडली. तर, न्ययमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती शुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी झाली.

हे ही वाचा >> “मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही”, रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

ट्रस्टने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, हिंदूंचं मंदिर पाडून त्याजागी ही मशीद उभारण्यात आली होती. त्यामुळे अशा बांधकामाला मशीद मानता येणार नाही. याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की प्रतिवाद्यांनी या वास्तूचं नुकसान केलं आहे. प्रतिवाद्यांमध्ये शाही मशीद ईदगाह व्यवस्थापन समितीसारख्या संस्थांचाही समावेश आहे. हिंदू मंदिराचे पुरावे असलेल्या मालमत्तेचं नुकसान केलं असल्याचं ट्रस्टचं म्हणणं आहे.