कर्नाटक विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. पाटील यांचे मुख्यमंत्र्यांशी उत्तम संबंध असले तरी विधान परिषदेतील ज्येष्ठ सदस्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावावी, अशी मागणी वीरण्णा मथीकट्टी आणि सी. मोटम्मा या परिषदेतील आमदारांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन केली होती. भाजपच्या राजवटीत पाटील हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. त्यांची वर्णी लावण्यात आल्याने वरिष्ठ सभागृहातील एकाच आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार
कर्नाटक विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. पाटील यांचे मुख्यमंत्र्यांशी उत्तम संबंध असले तरी विधान परिषदेतील ज्येष्ठ सदस्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावावी,
First published on: 26-05-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ktka cm inducts s r patil into ministry