कर्नाटक विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लावून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. पाटील यांचे मुख्यमंत्र्यांशी उत्तम संबंध असले तरी विधान परिषदेतील ज्येष्ठ सदस्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावावी, अशी मागणी वीरण्णा मथीकट्टी आणि सी. मोटम्मा या परिषदेतील आमदारांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन केली होती. भाजपच्या राजवटीत पाटील हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. त्यांची वर्णी लावण्यात आल्याने वरिष्ठ सभागृहातील एकाच आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा