भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात भारताच्यावतीने ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांनी हेग येथील आंतरराष्ट्रीय कोर्टात सोमवारी जोरदार युक्तीवाद केला. आजच्या दिवसाची सुनावणी संपली आहे. पाकिस्तानच्या वर्तनावरुन जाधव यांना पाकिस्तानात न्याय मिळेल असा विश्वास वाटत नाही. भारताविरोधात कथा रचण्यासाठी पाकिस्तानने जाधव यांचा उपयोग केला असा आरोप हरिश साळवे यांनी केला.
H Salve: Pakistan’s conduct doesn’t inspire confidence that Jadhav can get justice there. Pakistan has in custody an Indian National who has been publicly portrayed to be a terrorist&Indian agent creating unrest in Balochistan…Pak used Jadhav to build a narrative against India pic.twitter.com/edYvSZnhJ8
— ANI (@ANI) February 18, 2019
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना वकिल दिल्याशिवाय त्यांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. कुलभूषण जाधव यांच्या खटल्याच्या सुनावणीत कोर्टाचे नियम, प्रक्रिया यांचे पालन झालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानात झालेली सुनावणी बेकायदा जाहीर करावी असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला. कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवण्यापूर्वी पाकिस्तानने त्यांना आंतरराष्ट्रीय नियमानुसार राजनैतिक मदत दिली नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय कोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश द्यावेत अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
Harish Salve representing Kulbhushan Jadhav in International Court of Justice: I would invite this court to keep in mind the relief to be granted in the backdrop of the fact that his trial has been conducted by a military court pic.twitter.com/0gM8obyP8d
— ANI (@ANI) February 18, 2019
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुनावणी झालेली नाही. पाकिस्तानी लष्करी न्यायालयांनी दोन वर्षात १६१ नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावली असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या व्यासपीठाचा आपल्या प्रचारासाठी वापर करत आहे. हा न्यायलयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे असे हरिश साळवे म्हणाले.
भारतीय नौदलातील निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने दहशतवाद व हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात हा निर्णय सुनावल्यानंतर भारताने लगेचच मे महिन्यात या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. भारताकडून हरिश साळवे यांनी बाजू मांडली असून उद्या पाकिस्तान आपली बाजू मांडेल.
जाधव यांच्याविषयी खोटया गोष्टी पसरवत असल्याबद्दल पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानच्या वर्तनावरुन जाधव यांना पाकिस्तानात न्याय मिळेल असा विश्वास वाटत नाही. भारताविरोधात कथा रचण्यासाठी पाकिस्तानने जाधव यांचा उपयोग केला असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला.
पाकिस्तानने जाणूनबुजून, माहित असूनही विएन्ना कराराच्या कलम ३६चे उल्लंघन केले. कुलभूषण जाधव आणि भारताच्या अधिकारांचे पाकिस्तानने उल्लंघन केले असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला.
कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवण्यापूर्वी पाकिस्तानने त्यांना आंतरराष्ट्रीय नियमानुसार राजनैतिक मदत दिली नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय कोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश द्यावेत अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
कुलभूषण जाधव यांच्या खटल्याच्या सुनावणीत कोर्टाचे नियम, प्रक्रिया यांचे पालन झालेले नाही. ही सुनावणी बेकायदा जाहीर करावी असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला.
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या व्यासपीठाचा आपल्या प्रचारासाठी वापर करत आहे. हा न्यायलयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे असे हरिश साळवे यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुनावणी झालेली नाही. पाकिस्तानी लष्करी न्यायालयांनी दोन वर्षात १६१ नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावली असा युक्तीवाद हरिश साळवे यांनी केला.