उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या कुंभमेळ्यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. करोना कालावधीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या आयोजनाला परवानगी दिल्याने आधीच वाद झालेला असतानाच आता या कुंभमेळ्यामधील करोना चाचाण्यांसंदर्भातील माहिती समोर येत आहे. उच्च न्यायालयापासून अनेक सरकारी संस्थांनी या कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भातील सूचना केलेल्या. मात्र तरीही या कुंभमेळ्यामध्ये करोना चाचणी घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीय. आश्चर्याची बाब म्हणजे हा घोटाळा पंजाबमधील फरीदकोट येथे राहणाऱ्या एका एलआयसी एजंटमुळे समोर आला. विपन मित्तल असं या एलआयसी एजंटचं नाव आहे.
तपासादरम्यान देण्यात आलेली नाव आणि पत्ते खोटे असल्याची माहिती समोर आली. अनेक लोकांचा फोन नंबर सारखेच असल्याचंही दिसून आलं. अनेकांच्या अॅण्टीजन चाचण्यांचे किटही सारखेच दिसून आले. खरं तर सामान्यपणे अॅण्टीजन चाचण्यांसाठीचं किट एका व्यक्तीच्या चाचणीसाठी एकदाच वापरता येतं. राजस्थानमधील अनेक विद्यार्थ्यांची नावंही या यादीमध्ये आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी कुंभमेळ्यासाठी गेलेच नव्हते. कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये करोना चाचण्या करण्यासाठी आठ संस्थांच्या माध्यमातून चार लाख चाचण्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. सध्या चाचण्यांची काम देण्यात आलेल्या संस्थांची चौकशी सुरु आहे.
नक्की वाचा >> हे १०० रुपये घ्या आणि दाढी कटींग करुन या; महाराष्ट्रातील चहावाल्याची मोदींना मनी ऑर्डर
पॉझिटिव्हिटी रेटमुळे शंका…
एजन्सीकडून करण्यात आलेल्या एक लाख चाचण्या सध्या वादात आहेत. यापैकी फक्त १७७ रिपोर्ट पॉझिटिव्ह होते, ज्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के होता. याउलट एप्रिल महिन्यात हरिद्वारमधील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांवर पोहोचला होता. याच पॉझिटिव्हीटी रेटमुळे मोठ्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करण्यात आला.
नक्की वाचा >> समजून घ्या : Positivity Rate म्हणजे काय? तो इतका का महत्वाचा असतो?
आरोग्य मंत्रालयाने दिला कारवाईचा इशारा…
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी खोट्या चाचण्यांची एकूण संख्या किती आहे हे तपासानंतरच सांगता येईल, असं म्हटलं आहे. आपण उत्तराखंडच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली असल्याचंही लव अग्रवाल यांनी सांगताना या प्रकरणाचा अहवाल दोन आठवड्यांमध्ये देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामध्ये सहभाग असणाऱ्यांवर गरज पडल्यास गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.