महाकुंभमेळ्यातील एका आखाड्यामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये सापडून शुक्रवारी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या. गेल्या रविवारी अलाहाबाद रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत ३६ भाविकांचा मृत्यू झाला होता. 
वसंत पंचमीच्या निमित्ताने शाहीस्नानासाठी अनेक भाविक गंगा किनारी जमले आहेत. शुक्रवारी पहाटे सेक्टर क्रमांक ४ मधील एका आखाड्यात आग लागली. सुमारे १० तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेनंतर लगेचच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्युमुखी पडलेली व्यक्ती ही आपल्या तंबूत झोपली होती आणि आग लागल्याचे तिला पटकन समजले नाही. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला, असे प्राथमिक तपासातून दिसून आले आहे.

Story img Loader