Sunita Williams Indian Family : अमेरिकास्थित असलेल्या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे वडील भारतातील गुजरातचे असून ते कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले होते. असं असलं तरीही सुनीता विल्यम्स या त्यांच्या भारतातील नातेवाईकांच्या सतत संपर्कात असतात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातूनही (Internation Space Station) त्या भारतातील त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होत्या. याचविषयी त्यांची चुलत बहीण फाल्गुनी पांड्या यांनी सांगितलं. त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली आहे.
फाल्गुनी पांड्या म्हणाल्या की, सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्याबरोबर अंतराळात गणपती बाप्पाची मूर्ती नेली होती. ही मूर्ती संपूर्ण प्रवासात त्यांच्याबरोबर होती. तिच्या सुरक्षित प्रवासासाठी आम्ही विशेष प्रार्थना केली होती. होम हवन केले होते:, असंही त्या म्हणाल्या. फाल्गुनी पांड्या यांनी असेही सांगितले की सुनीता विल्यम्स यांनी आयएसएसवर अवकाशात तरंगणाऱ्या गणेश मूर्तीचा एक फोटो शेअर केला होता. सुनीता विल्यम्स यांना भारतीय जेवण फार आवडतं. त्यामुळे त्या भारतातही भेट देणार आहेत. मला माहितेय ती भारतात येणार आहे. फक्त याविषयी अद्याप तारीख ठरलेली नाही. ती भारतात आली की आम्ही संपूर्ण कुटुंब फिरायला जाणार आहोत “, असंही पांड्या यांनी सांगितलं.
ISS वर पाठवली होती काजुकतली
१९ सप्टेंबर रोजी सुनीता विल्यम्स यांचा ५९ वा वाढदिवस साजरा झाला. तेव्हा त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात होत्या. तिथेही त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी काजूकतली पाठवली होती, असंही फाल्गुनी पांड्या म्हणाल्या. तसंच, भारतात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले होते. या कुंभमेळ्यात कोट्यवधि लोकांनी भेट दिली. फाल्गुनी पांड्या यांनीही येथे भेट दिली होती. हे फोटो सुनीता विल्यम्स यांनी मागवून घेतले होते, असंही त्या म्हणाल्या.
स्पेसमध्ये समोसे खाणारी ती पहिली अंतराळवीर आहे. त्यामुळे ती भारतात परतल्यावर आम्ही तिच्यासाठी समोसा पार्टी करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे वडील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २००७ मध्ये भेटलो होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होती.