Kunal Kamara and Blinkit CEO : प्रसिद्ध कॉमिडियन कुणाल कामरा याची गेले वर्षभर ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याबरोबर शा‍ब्दिक वाद सुरू होते. अग्रवाल यांची कंपनी ग्राहकांच्या तक्रारींकडे लक्ष देत नसल्याचे तसेच ग्राहकांना योग्य सेवा मिळत नसल्याचा मुद्दा कुणाल कामराने उपस्थित केला होता. यानंतर आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कुणाल कामराने आणखी एका कंपनीशी पंगा घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म भारतात झपाट्याने वाढताना दिसत आहेत. यामध्ये ब्लिंकिट, स्विगी इंस्टामार्ट आणि झेप्टो सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये काही मिनिटांत ग्राहकांच्या दारात किराणा सामान आणि इतर घरगुती वस्तू यांच्याकडून पोहोचवल्या जात आहेत.

Puneet Khurana suicide case delhi
Video: “तू फट्टू आहेस…”, पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; अतुल सुभाष प्रकरणासारखा व्हिडीओ रेकॉर्ड केला
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
train hits student sitting on track with headphones
हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला, कुटुंबानं एकुलता मुलगा गमावला
jitendra Awhad post on Walmik Karad
Jitendra Awhad : वाल्मिक कराडप्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांच्या मध्यरात्री दोन सोशल मीडिया पोस्ट; धक्कादायक दावा करत म्हणाले…
beed crimes walmik karad latest marathi news
बाहुबलीचे बीड : बीडच्या दहशतीला पवनऊर्जेचे वारे!
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
Deepinder Goyal Success Story
Success Story : सामान्य कुटुंबात जन्म, सहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण; पण, तरुणपणी मेहनतीने उभी केली तब्बल करोडोंची कंपनी

वस्तु काही मिनिटांमध्ये हातात मिळत असल्याने ग्राहकांसाठी हे चांगलेच सोयीचे झाले आहे. मात्र यामध्ये कुणाल कामरा यांने या वाढत असलेल्या क्षेत्राची दुसरी काळी बाजू मांडली आहे. या प्लॅटफॉर्म्सकडून कशा प्रकारे गिग कामगारांची जास्त तास काम आणि कमी पगार देऊन पिळकवणूक केली जाते याबद्दल कामराने भाष्य केले आहे.

ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर ढींडसा त्यांनी ब्लिंकीटहून केल्या जात असलेलल्या ऑर्डर्सबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. २०२४च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ढींडसा यांनी केलेल्या पोस्टमध्ये १.२ लाख कंडोमचे पॅक आणि ४५,००० मिनरल वॉटरच्या बाटल्या ब्लिंकिटद्वारे वितरीत केल्याची माहिती दिली होती. याला रिप्लाय करत कुणाल कामराने या सर्व डिलीव्हरींमधून त्या डिलीव्हरी कामगारांनी किती पैसे कमावले? याबद्दल विचारणा केली.

कुणाल कामराने नेमकं काय म्हटलंय?

“तुम्ही २०२४ मध्ये तुमच्या ‘डिलिव्हरी पार्टनर्स’ना दिलेल्या सरासरी वेतनाचा डेटा आम्हाला देऊ शकता का…” असा थेट सवाल कामराने सीईओ ढींडासा यांना विचारला.

कामराने त्याच्या पोस्टमध्ये ‘डिलीव्हरी पार्टनर्स’ शब्दावर जोर दिल्याचे पाहायला मिळाले, कारण ब्लिंकिट, झोमॅटो, स्विगी इत्यादी डिलिव्हरी ॲप्स त्यांच्या डिलिव्हरी कर्मचार्‍यांना कंपनीचे कर्मचारी मानत नाहीत किंवा त्यांना तशी नियुक्ती दिली जात नाही. त्याऐवजी अशा कामगारांना ‘पार्टनर’ म्हणून नियुक्त केले जाते जे एक किंवा अधिक कंपन्यांसाठी काम करू शकतात. गिग कामगारांना कंपनीचे कर्मचारी म्हणून नियुक्ती न दिल्याने या बड्या कंपन्यांना त्यांना योग्य पगार,वैद्यकीय विमा आणि कर्मचार्‍यांना अपेक्षित असलेले इतर भत्ते द्यावे लागत नाहीत.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये कुणाल कामरा याने या संपूर्ण उद्योगाची काळी बाजू मांडली आहे. ज्यामध्ये त्याने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून गिग कामगारांची पिळकवणूक होत असल्याचा आरोप केला आहे.

“आपण क्विक कॉमर्सच्या सुविधेचा आनंद घेत असताना मला माझं २०२५ मधील पहिलं ट्विट काळी बाजू दाखवणारं असावं असं वाटतं”, असं कामरा म्हणाला आहे.

हेही वाचा>> Jaisalmer Tubewell Water Burst Video : जैसलमेरमध्ये जमिनीतून उसळला पाण्याचा फवारा, लोकांमध्ये घबराट; सरस्वती नदीशी काही संबंध आहे का? तज्ज्ञ म्हणाले…

“प्लॅटफॉर्म मालक गिग कामगारांचे शोषण करतात आणि ते रोजगार निर्मिती करणारे नाहीत. ते कोणतीही जमीन नसलेले जमीनदार आहेत. त्यांच्याकडे कसलीही सर्जनशीलता किंवा नाविन्य नाही, ते फक्त आकांक्षा पूर्ण करू शकत नाही इतकं वेतन देऊन न परवडणारे स्वातंत्र्य देऊ करत लोकांचे शोषण करतात.”, असा हल्लाबोल कामराने केला आहे.

कुणाला कामराने पुढे त्याच्या पोस्टमध्ये , कोणत्याही नियम किंवा कायद्याच्या अभावामुळे ज्याप्रकारे गिग कामगारांचे शोषण केले जाते त्यावरून क्विक कॉमर्स कंपन्यांच्या सीईओंचा उल्लेख ठग असा केला आहे. “हे ठग आहेत जे डेटाचा वापर तेलाची साठे नसतानाही तेलासारखा करत आहेत. कधीतरी नियम बनतील आणि हे जमिनीवर येतील…”, असे कुणाल कामरा म्हणाला आहे.

Story img Loader