Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदेंच्या विरोधात विडंबन करणारं गाणं म्हटल्याचं प्रकरण ताजं आहे. त्याच्या विरोधात जोरदार कारवाई केली जाते आहे. तसंच संजय निरुपम यांनी कुणाल कामराने माफी मागितली नाह तर आम्ही योग्य शब्दांत उत्तर देऊ असं म्हटलं आहे. दरम्यान कुणाल कामराने त्याच व्हिडीओत पंतप्रधान मोदींचा उल्लेख हुकूमशहा असं करत गाणं गायलं आहे. यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
मोदींबाबत काय म्हटलं आहे कुणाल कामराने?
हमारा आखरी गाना है देश के सबसे इंपॉर्टंट आदमी के उपर. ये गाना है मोदीजीके चंचल चरित्रपर. पहले उन्होने बीस साल एकतर्फा नफरत में एक इटालियन महिला के पिछे गवाँए..अब अगले बीस साल एकतर्फा प्यार में एक इटालियन महिला के पिछे गवाँने वाले है. मोदी मेलोनीजी के पिछे पिझ्झा पॅन लेकर घुम रहे है. ढोकला पिझ्झा सिखा रहें है उन्हे. असा उल्लेख करत कुणाल कामराने गाणं म्हटलं आहे. “झुठा हूँ मै, कातिल भी हूँ… सब घोटालो में.. शामिल भी हूँ, एमपी चुराना, व्हॉईसेस दबाना बस यही मेरा कसूर, वादो से अपने मुकरता नहीं. पुरा उन्हे कभी करता नहीं. तानाशाह ओ तानाशाह.” हे गाणं कुणाल कामरा म्हणताना दिसतो आहे. या व्हिडीओमुळे आता नवा वाद होण्याची चिन्हं आहेत. या गाण्याला कुणाल कामराने बादशहा ओ बादशहा या चित्रपटातील टायटल साँगची चाल दिली आहे.
कोव्हिड बाहेरच्या देशातून आला आपण लॉकडाऊन देशात लावला-कुणाल कामरा
आपल्याकडे कोव्हिड आला बाहेरच्या देशातून आला, आपण देशात लॉकडाऊन लावला. पाच वाजता थाळी बडवण्याची अॅक्टिव्हिटी देण्यात आली. या थाळी बडवण्याचा काय उपयोग झाला? मी हे बघायला उभा होतो की दंगल झाली तर माझ्या घरात कोण कोण येईल ते बघायला उभा होतो असं म्हणत कुणाल कामराने करोना काळाचीही खिल्ली उडवली.
ईडी सीबीआयविरोधातही या शोमध्ये कुणाल कामराने म्हटलं गाणं
ईडी आणि सीबीआयवरही कुणाल कामराने गाणं म्हटलं आहे. ईडी सीबीआयला मोदींनी मुभा दिली आहे. महाराष्ट्रात ईडीने ते करुन दाखवलं जे मिशनरी करु शकले नाहीत. सीबीआय जो पिछे लग जाये, या ईडी तुझे सताये आजा प्यारे पास हमारे काहे घबराये, पार्टी मेरी भ्रष्टाचारी, संघ की आग्याकारी जिस के सर पे हात फेरो चार्जशीट हो जाये कोरी, मर्डरर हो या रेपिस्ट सबको बेल मिल जाए.. असं गाणंही कुणाल कामराने म्हटलं आहे.