नवी दिल्ली : कुवेतच्या मंगफ भागातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४० हून अधिक भारतीयांच्या मृतदेहांची डीएनए चाचणी तेथील अधिकारी करत असून मृतदेह आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचे विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. अल-मंगफ इमारतीला लागलेल्या आगीत एकूण ४९ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ४२ जण भारतीय असल्याचे समजते.

आगीत जखमी झालेल्या भारतीयांच्या मदतीवर देखरेख करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव लवकरात लवकर परत मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग कुवेतला पोहोचले आहेत. तेथे सिंग यांनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सांगितले की अल-याह्या यांनी वैद्याकीय सेवा, मृतदेह त्वरित परत आणणे आणि घटनेच्या तपासासह संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. दूतावासाने समाजमाध्यमांवर म्हटले आहे की, ‘परराष्ट्र मंत्री याह्या यांनी या दु:खद घटनेबद्दल शोक व्यक्त केला. राज्यमंत्र्यांनी सर्व संबंधित कुवेती अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले.’

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

सिंग यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटललाही भेट दिली. तिथे सात जखमी भारतीयांना दाखल केले आहेत. तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री एक निवेदन जारी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना ‘दु:खद’ असल्याचे म्हटले.

हेही वाचा >>> इटलीच्या पार्लमेंटमध्ये हाणामारी

दोन लाखांची मदत

पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर, मोदींनी मृत भारतीयांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि सरकारने सर्व शक्य मदत पुरवावी असे निर्देश दिले. परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांचे कुवेती समकक्ष अल-याह्या यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत आगीत प्राण गमावलेल्या भारतीयांचे मृतदेह तात्काळ भारतात पाठवण्याची विनंती केली. आगीच्या घटनेबाबत कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांच्याशी संवाद साधला.

कुवेती अधिकाऱ्यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.

केरळ सरकारकडून ५ लाखांची मदत

तिरुअनंतपुरम : केरळ सरकारने कुवेत आगीत मृत्युमुखी पडलेल्या केरळमधील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज सकाळी मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतल्याचे सांगण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांवर उपचारासाठी राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांना तात्काळ कुवेतला पाठवण्याचा आणि मृतदेह भारतात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही निवेदनात म्हटले आहे.

मृतांची ओळख पटली

दुबई/कुवेत सिटी : मंगफ शहरात परदेशी कामगारांच्या निवासस्थानाच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीय आणि तीन फिलिपिनो नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटवली आहे, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून काम करणारे शेख फहाद अल-युसूफ अल-सबाह म्हणाले की, अधिकाऱ्यांनी ४८ मृतदेहांची ओळख पटवली आहे, त्यापैकी ४५ भारतीय आणि तीन फिलिपिनो नागरिकांचे आहेत. उर्वरित एका मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कुवेतच्या सरकारी वकिलाने या घटनेचा तपास सुरू केला आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.