भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर भारत देशावर जगभरातून टीका केली जात आहे. आखाती देशांनी तर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण अद्यापही शांत झालेले नसून भारतासह विदेशातही निदर्शने करण्यात येत आहेत. दरम्यान, कुवेत या देशाने नुपूर शर्मा यांच्या टिप्पणीच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कडक पवित्रा धारण केला आहे. निदर्शनांमध्ये भाग घेतलेल्या कुवेतमधील परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येणार आहे. कुवेत सरकारतर्फे तशी कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>> National Herald Case: राहुल गांधी पुन्हा ईडी कार्यालयात हजर; पहिल्या टप्प्यात तीन तासांच्या प्रश्नोत्तरानंतर पुन्हा एकदा चौकशी सुरु

सौदी अरेबियामध्ये प्रकाशित होणाऱ्या अरब न्यूज या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार कुवेतमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्या समर्थनार्थ तसेच नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी फहाहील येथे परदेशी नागरिकांकडून निदर्शने करण्यात आली. याच परदेशी नागरिकांना आता अटक करण्यात येत आहे. तसेच निदर्शनात सहभागी असलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जाणार आहे. कुवेत देशाील कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे तसेच बंदी असताना रस्त्यावर उतरल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>> एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स नियोजित वेळेनुसार भारताला मिळणार

“गुप्तचरांच्या माध्यमातून निदर्शनामध्ये सहभागी असलेल्या परदेशी नागरिकांना अटक करण्यात येत आहे. तसेच या परदेशी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जाणार आहे. या प्रवाशांना परत कुवेतध्ये प्रवेश दिला जाणार नाही,” असे वृत्त अल राय या कुवेत येथील वृत्तापत्राने दिले आहे. मात्र या वृत्तामध्ये नेमकं कोणत्या देशातील नागरिकांना त्यांच्या मूळ देशात पाठवले जाणार आहे, याबाबत भाष्य केलेले नाही.

हेही वाचा >>>> नुपूर शर्मांना कोलकाता पोलिसांची नोटीस; २० जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

दरम्यान, नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर कुवेतमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांना कुवेत परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त केला होता. तर दुसरीकडे भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे. तसेच नुपूर शर्मा यांनी केलेली टिप्पणी ही सरकारची भूमिका नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केलेले आहे.

Story img Loader