नरेंद्र मोदी यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुक प्रचारमोहिम समितीच्या प्रमुखपदी बसवण्यावरून भाजपमध्ये मोठे वादळ उठले आहे. मोदींच्या नावाच्या घोषणेवरून पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यावर प्रचंड दबाव असून, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना शेवटच्या दिवशी पक्षाच्या व्यासपीठावर आणण्यासाठी धडपड सुरू आहे.
एका मध्यस्था मार्फत राजनाथ सिंग यांनी अडवाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. मात्र, शनिवारी पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या अडवाणी यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत पक्षाध्यक्षांनी रविवारी प्रचार प्रमुखाच्या नावाची घोषणा करावी असे सांगितले. अडवाणी यांनी अजून एक समांतर ‘निवडणूक व्यवस्थापन समिती’ स्थापनकरण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे सर्वांचे लक्ष राजनाथ सिंग काय करतात याकडे लागले आहे. दुसरया बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या नावाची घोषणा करण्यासाठी भाजप अध्यक्षांवर दबाव वाढवला असल्याचे वरिष्ठ पक्षसूत्रांनी सांगितले आहे.
“अडवाणी बैठकीला येवोत अथवा न येवोत मोदींच्या नावाची घोषणा करण्याचे स्पष्ट आदेश संघाचे नेते सुरेश सोनी यांनी अध्यक्षांना दिले आहेत.”, असेही सूत्रांनी सांगितले.
मोदींच्या नावाची घोषणा करण्यावरून राजनाथ दबावात
नरेंद्र मोदी यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुक प्रचारमोहिम समितीच्या प्रमुखपदी बसवण्यावरून भाजपमध्ये मोठे वादळ उठले आहे. मोदींच्या नावाच्या घोषणेवरून पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यावर प्रचंड दबाव असून, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना शेवटच्या दिवशी पक्षाच्या व्यासपीठावर आणण्यासाठी धडपड सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-06-2013 at 10:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: L k advani stays away but rajnath under pressure to anoint narendra modi