लोकसभा निवडणुकांसाठी भोपाळ मतदारसंघाऐवजी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने नाराजी व्यक्त करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष नसून सर्व काही आलबेल असल्याचे दाखवून देण्यासाठी अडवाणींचा उमदेवारी अर्ज दाखल करतेवेळी नरेंद्र मोदी जातीने उपस्थित राहिले असल्याची चर्चा आहे. लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आपण उत्साहित असल्याची प्रतिक्रिया यावेळी लालकृष्ण अडवाणींनी दिली. तसेच मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल गुजरातची जनता, माध्यमांचा आभारी आहे. गांधीनगरमधून पुन्हा निवडणूक लढविताना आपल्याला आनंद होत असल्याचे अडवाणींनी सांगितले. यावेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना “मोदी किंवा अन्य कुणाचीही तुलना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी करणार नाही. वाजपेयींचे नेतृत्व वेगळ्याच दर्जाचे होते. नरेंद्र मोदी हे अत्यंत कुशल संघटक आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी चांगली होईल” असा विश्वास लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा